दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दिल्ली हे शहर असून प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 1,483 चौरस किमी इतके आहे. दंतकथेनुसार दिल्ली या शहराची स्थापना इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूवी झाली आहे. 1911 मध्ये इंग्रजांनी भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे स्थलांतरीत केली. 1956 ला दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 1991 ला दिल्ली प्रदेशाच्या सरकारला जास्तीचे अधिकार देण्यात आले. 2011 च्या जनगणनेनुसार प्रदेशाची लोकसंख्या 1,67,53,235 इतकी आहे. या प्रदेशाची साक्षरता 86.34 टक्के आहे. दिल्लीच्या अधिकृत भाषा हिंदी, पंजाबी आणि उर्दू या आहेत. भारताच्या उत्तर भारतातला केंद्रशासित प्रदेश आणि भारताची राजधानी ही या शहराची ओळख.
महाभारत काळापासून दिल्लीचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. सतत सत्तेचे हस्तांतरण. आधी मौर्य, पल्लव. मध्य भारतातील गुप्त, नंतर चार शतके अफगाण व मुस्लीम लोकांचे आक्रमण आणि सर्वात शेवटी सोळाव्या शतकात मोगलांकडे सत्ता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीला ब्रिटीशांनी सत्ता स्थापन केली. त्यांच्या सर्व हालचालींचे केंद्र दिल्ली होते. 1947 नंतर दिल्ली भारताची राजधानी झाली. 1956 मध्ये दिल्ली केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झाला. पूर्व भाग वगळता सर्व बाजूला हरियाणा हे राज्य असून पूर्वेला उत्तर प्रदेश हे राज्य आहे. 69 व्या घटनादुरूस्ती झाल्याने दिल्ली विधानसभा स्थापित झाली.
इ.स. 1991 मध्ये कायदा संमत होऊन राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. यमुना नदीच्या पश्चिम तीरावर हे शहर वसले आहे. पूर्व किनाऱ्यावरही आता विस्तार होत आहे. हे शहर जुनी दिल्ली व नवी दिल्ली या दोन विभागात पसरलेले आहे. जुनी दिल्ली हे संपूर्ण तटबंदीचे पुरातन शहर आहे. मुख्यत: मोगल काळात या शहराचा विकास झाला.
इंग्रजांनी इ.स. 1911 मध्ये कोलकात्याहून आपली राजधानी दिल्लीस स्थलांतरित केली व नवी दिल्ली या शहराचा पाया रोवला. सुप्रसिद्ध वास्तु विशारद लुटिन्स व बेकर यांनी सुंदर, भव्य व विशाल ब्रिटीश राजधानीची येथे निर्मिती केली. विस्तीर्ण रस्ते व दुतर्फी व उंच उंच वृक्षराजी, भव्य चौक व दुतर्फा पसरलेले भव्य बंगले हे नवी दिल्लीचे खास आकर्षण आहे. देशाची राजधानी असल्यामुळे येथून देशभर दळणवळणाचे जाळे विणण्यात आले. रेल्वे, विमान तसेच रस्त्यांनी सर्व भागांशी हे शहर जोडण्यात आले. राष्ट्रीय मार्ग क्र. 1, 2, 8, 10 व 24 येथून सुरू होतात.
नवी दिल्लीस उत्तर रेल्वेचे मुख्यालय आहे. नवी दिल्ली व जुनी दिल्ली ही येथील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत. हे स्थान महाभारताइतके प्राचीन आहे. येथे पांडवांनी इंद्रप्रस्थ या आपल्या राजधानीची स्थापना केली होती. त्यानंतर या स्थानाने अनेक साम्राज्यांचा उदय, ऱ्हास व अंत अनुभवला आहे. प्राचीन, मध्ययुगीन, मोगल, ब्रिटीश व स्वातंत्र्योत्तर काळातील संस्कृती व वास्तुशिल्पांचा सुंदर समन्वय येथे पाहावयास मिळतो.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/13/2020
राजधानी दिल्लीत गेल्या 28 वर्षांपासून स्वतः शाळा स...
चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी चंदीगड हे ...
गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्...
दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील एक जुने विद्यापीठ.