नॉर्वे व स्वीडन यांच्या सीमेवरील पर्वतश्रेणी. हीचे सर्वोच्च शिखर केब्नकाइस (२,१२३ मी.) असून इतर लहानमोठी शिखरे १,८०० मी.पेक्षा उंच आहेत. आकावरे, मार्कोटन, साऱ्येक्टयाक्को, टारेकाइस रेप्पेंटयाक्को, कुस्ट्रकाइस, सूलिट्येलमा, पार्टेलायेट ही शिखरे महत्त्वाची आहेत.
या पर्वतातून पूर्व उतारावर वाहणाऱ्या अनेक नद्यांतून निर्माण झालेल्या सरोवरातून मूआनीओ, टॉर्न, पीट, शेलेफ्ट वगैरे नद्या पुढे वाहत जाऊन बॉथनिया आखाताला मिळतात. पर्वताच्या वायव्येकडे समुद्र किनाऱ्यावर, उत्तर नॉर्वेतील नॉर्विक हे प्रसिद्ध व महत्त्वाचे बंदर आहे.
पर्वताच्या शाखा विशेषेकरून वायव्य-आग्नेय पसरल्या असून आकावरे शिखराच्या पूर्वेकडे सरोवरांनी युक्त राष्ट्रीय उद्यान आहे. नॉर्वेजियन समुद्राकडे गेलेल्या शाखांदरम्यान विभंग व हिमानी क्रिया यांमुळे निर्माण झालेले प्रसिद्ध फ्योर्ड आहेत. पर्वतमय प्रदेश व अतिथंड हवामानामुळे या प्रदेशांत महत्त्वाची शहरे अथवा लोकवस्तीही विशेष नाही.
खातु, कृ. का.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/9/2020
अॅपालॅचिअन पर्वत : उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्...
कार्पेथियन : मध्य व पूर्व यूरोपातील पर्वतश्रेणी. ह...
कॉकेशस : यूरोप व आशिया खंडांमधील पारंपारिक नैसर्गि...
खांगाई : मंगोलिया प्रजासत्ताकाच्या पश्चिममध्य भागा...