मंगोलिया प्रजासत्ताकाच्या पश्चिममध्य भागातील पर्वतश्रेणी. ८०० किमी. लांबीच्या या अल्ताई समांतर श्रेणीचे ऑत्खोनतेंग्री शिखर ४,०३१ मी. उंच आहे.
बैकल सरोवराला मिळणारी १,४४४ किमी. लांबीची येथील प्रमुख नदी सेलेंगा व १,१२७ किमी. लांबीची तिची उपनदी खांगाईच्या उत्तर उताराच्या वनप्रदेशातून वाहतात.
दक्षिण उतारावरून झाबखान ८०० किमी. जाऊन ऐरख नॉर सरोवरास मिळते. पश्चिम खांगाई विभागातील शेतमाल, लोकर, कातडी, फर इत्यादींची व्यापारपेठ उल्यासाताई (हल्लीचे जीबखालांटू), उत्तर खांगाईतील हमरस्त्यावरील पूर्वीचे मठस्थान व आजचे व्यापारकेंद्र त्सेत्सेर्लीख आणि दक्षिण खांगाईची राजधानी आर्बाइ खेरे ही केंद्रे खांगाईच्या पायथ्याशी आहेत.
कुमठेकर. ज. ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/31/2020
चलेन : नॉर्वे व स्वीडन यांच्या सीमेवरील पर्वतश्रेण...
अॅपालॅचिअन पर्वत : उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्...
झॅग्रॉस पर्वत : नैर्ऋत्य इराणमधील जुरासिक काळातील ...
कार्पेथियन : मध्य व पूर्व यूरोपातील पर्वतश्रेणी. ह...