हालेरी वंशातील मुद् दू राजाने मरकाराचे मध्यवर्ती व दुर्गम स्थान लक्षात घेऊन तेथे १६८१ मध्ये किल्ला व राजवाडा बांधला आणि ही राजधानी म्हणून निश्चित केली.
मुद् दू राजाच्या नावावरून हे प्रथम ‘मुद्दू- राजाकेरी’ म्हणून ओळखले जात होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या आदेशावरून कूर्गचे सर्वेक्षण करणार्या लेप्टंन पी. कॉनर याने मरकाराचा उल्लेख ‘मुद्दूकेर’ असा केला, त्याचे स्थानिक नाव मडिकेरी असे होते. ब्रिटीश अंमलात त्याला सांप्रतचे नाव मिळाले.
ऐकोणिसाव्या शतकारंभी मरकारा लहानसे खेडे होते. मात्र वीरराजेंद्र या राजाच्या कारकीर्दीपासून त्याचा विकास होत गेला. महादेवम्माजी या आपल्या दुसर्या राणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याने किल्ल्याच्या उत्तरेस ‘महादेवपेट’ नावाचे एक नवे नगर वसविले (१८००-०५).
वीरराजेंद्रनंतर गादीवर आलेल्या लिंगराजेंद्र वोडेयर दुसरा या त्याच्या भावाने १८१२-१४ या काळात किल्ल्यामधील राजवाडा विटा व चुना यांनी पुन्हा बांधला, सांप्रत त्यांमध्ये महत्वाची प्रशासकीय कार्यालये असून राजवाड्यासमोर उजव्या बाजूला महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय आहे. किल्ल्याच्या पूर्वेस लिंगराजेंद्र राजानेच १८२० मध्ये बांधलेले ओंकाररेश्वर मंदिर आहे.
हे शिवमंदिर मुसलमानी वास्तुशैलित बांधलेले आहे. याशिवाय वीरराजेंद्र, लिंगराजेंद्र या राजांची स्मारके, नगरभवन इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत. येथे १८७० साली नगरपालिका स्थापन करण्यात आली. औद्योगिक व शैक्षणिक केंद्र म्हणूनही (शासकीय मुद्रणालय, शासकीय केंद्रीय कर्मशाळा, विद्यालये, महाविद्यालये इत्यादींमुळे) या शहरास महत्व येत आहे. ऑक्टोबर ते मे यांदरम्यान पर्यटकांची या गिरिस्थानी सतत वर्दळ असते.
गद्रे, वि. गाडे, ना. स.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/13/2020
भंडारदरा वनपरिक्षेत्रात पेंडशेत, पांजरे, उडदावणे, ...
हिमाच्छादित शिखरे सोडली तर महाराष्ट्रात अमर्याद पर...
केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या...
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावापासून मुक्ती मिळण...