অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सॅक्सिफ्रागेसी

सॅक्सिफ्रागेसी

सॅक्सिफ्रागेसी

पाषाणभेद कुल फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक लहान कुल. जॉन हचिन्सन यांनी याचा अंतर्भाव सॅक्सिफ्रागेलीझ (पाषाणभेद) गणात केला आहे; तर जॉर्ज बेंथॅम व सर जोसेफ डाल्टन हूकर आणि आडोल्फ (हाइन्रिक गुस्टाफ) एंग्लर कार्ल फोन प्रांट्ल (प्रँट्ल) यांनी रोझेलीझ (गुलाब) गणात केलेला आढळतो. बेंथॅम हूकर यांच्या वर्गीकरण पद्घतीत सेफॅलोटेसी कुनोनिएसी या लहान कुलांचाही त्याच गणात समावेश केलेला आहे रोझेसी (गुलाबकुल) क्रॅसुलेसी (घायमारी कुल) यांच्याशी सॅक्सिफ्रागेसीचे आप्तभाव आहेत; या कुलांचा उगम विकास रोझेलीझमधील इतर सात कुलांप्रमाणे रॅनेलीझ (मोरवेल) गणापासून झाला असावा, असे मानतात. पाषाणभेद (हिं. पाखानभेद) ह्या भारतीय ओषधी वनस्पतीवरून या कुलाला मराठीत पाषाणभेद हे कुलनाव सुचविलेले आहे.

सॅक्सिफ्रागेसी कुलात सु. ३० प्रजाती आणि सु. ५८० जाती (ए. बी. रेंडेल :८० प्रजाती ,१०० जाती; जे. सी. विलिस: ९० प्रजाती ७५० जाती) समाविष्ट असून त्यांचा प्रसार मुख्यतः उत्तर समशीतोष्ण प्रदेशात आणि काही अंशी दक्षिण समशीतोष्ण उष्णकटिबंधांतील डोंगराळ भागांत आहे. बहुतेक जाती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ ओषधी (लहान नरम वनस्पती), काही क्षुप (झुडपे) वृक्ष आहेत. काही आल्पीय आणि धुवीय प्रदेशांतील जाती मरुवनस्पती (रुक्ष ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती) आहेत. या कुलातील वनस्पतींची पाने एकाआड एक, क्वचित समोरासमोर अनुपपर्ण [ तळाशी उपांगे नसलेली; पान] असून फुलोरे विविध असतात; फुले बहुधा द्विलिंगी, नियमित, चक्री (फुलातील अवयवांची भिन्न मंडले असणारी) पंचभागी (प्रत्येक मंडलात पाच पुष्पदले असलेली) असून पुष्पासन (फुलातील पुष्पदलांचा आधारभूत भाग) सपाट किंवा कमी-जास्त खोलगट असते. केसरदले (पुंकेसर) परिदले अपिकिंज किंवा परिकिंज, पुष्पमुकुट क्वचित नसतो किंवा पाच जुळलेल्या पाकळ्यांचा असतो, बहुधा पाकळ्या त्याखालची दले (संदले) सुटी; केसरदलांची प्रत्येकी पाचांची दोन मंडले बाहेरचे मंडल पाकळ्यांसमोर; किंजदल (स्त्री-केसर) क्वचित सुटी पाकळ्यांइतकी, बहुधा कमी, खाली जुळलेली जास्त करून दोनच असतात. किंजपुट ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ; बीजके (अपक्व बीजे) अधोमुख अनेक; बीजकविन्यास अक्षलग्न (बीजकांची मांडणी :मध्यवर्ती अक्षाला चिकटलेली); फुलातील केसरदले किंजदलापूर्वी पक्व होतात[ फूल ]. फळात (मृदू किंवा शुष्क) अनेक सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेली) बीजे असतात. अनेक प्रजातींमधील जातींच्या पानांत जलप्रपिंडे (पाण्याचे थेंब बाहेर टाकणाऱ्या ग्रंथी) असतात. त्यांत कित्येकदा चुना विरघळलेला असल्याने त्याचे नंतर पानांवर पांढरे ठिपके दिसतात, त्यामुळे बाष्पीभवन कमी होते

र्गेनिया, सॅक्सिफ्रागा, मिटेला, ह्यूशेरा, ॲस्टिल्बे इ. यातील प्रमुख प्रजाती आहेत. शिवाय हिमालयात राइब्स हायड्रँजिया यांच्या जातीही आढळतात. भारतातबसक पाषाणभेद या ओषधीय वनस्पती आढळतात.

सक

(डिक्रोआ फेब्रिफ्यूजा). ही सुंदर सदापर्णी आणि १२-२२ सेंमी. उंच वाढणारी जाती खासी टेकड्या व समशीतोष्ण हिमालयात नेपाळपासून पूर्वेकडे (सस. पासून १,२००-२,४०० मी. उंचीपर्यंत) आणि चीनमध्ये आढळते. तिला निळी फुले येतात. चीनमध्ये फार पूर्वीपासून या वनस्पतीची मुळे व कोवळ पल्लव (शेंडे) हिवतापावर वापरतात. भारतातही हाच उपयोग, ती वनस्पती ज्या ठिकाणी आढळते तेथे करतात. दुसऱ्या महायुद्घाच्या काळात, कोयनेल दुर्लभ झाल्यामुळे हिचा शास्त्रीय अभ्यास होऊन तिचे वर दिलेले गुणधर्म सिद्घ झाले आहेत. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीची लागवड करून तिच्यापासून औषधांचे उत्पादन केले जात आहे. तेथे आले, कासवाचे कवच आणि सुपारी यांबरोबर हिची सुकी मुळे व पल्लव उपयोगात आणतात. आयुर्वेदात हिच्या मुळांची साल ज्वरघ्न (ताप कमी करणारी) व वामक (ओकारी करणारी) असल्याचे नमूद आहे.

र्गेनिया प्रजातीतील तीन जाती भारतात आढळतात. त्यांपैकीब. लिग्युलॅटा [सॅक्सिफ्रगा लिग्युलॅटा; पाषाणभेद] ही औषधोपयोगी आहे. ब. सिलिएटा ही समशीतोष्ण हिमालयातील जातीपाखानभेदया हिंदी नावाने प्रसिद्घ आहे. पाषाणभेदाचे व्यापारी नावही तेच आहे. गूजबेरी (राइब्स ग्रॉस्युलॅरिया) ह्या वनस्पतीची प्रजाती रेंडेल यांनी या कुलात घेतली आहे परंतु हल्ली ती ग्रॉस्युलॅरिएसी या नवीन कुलात समाविष्ट केली जाते.

पहापाषाणभेद; रोझेलीझ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India Raw Materials, Vol.I Delhi, 1948.

2. Rendle, A. B.1963 परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate