Trap for mosquitoes डासांसाठी_पिंजरा
रक्तदान करा
--- पण डासांना नको ---
करून पहा
डासांसाठी पिंजरा.-----
साहित्य -
- १ कप पाणी
- पाव कप चिरलेला गूळ
- १ ग्रॅम यीस्ट
- १ प्लॅस्टिकची पाण्याची बाटली.
कृती -
- १ कप कोमट पाण्यात पाव कप चिरलेला गूळ घाला. ते गार होऊ द्या.
- दरम्यान प्लॅस्टिकची पाण्याची बाटली आडव्यात कापा.
- बाटलीच्या खालच्या भागात गुळाचे गार झालेले पाणी ओता.
- त्यात १ ग्रॅम यीस्ट घाला. ढवळण्याची गरज नाही. त्यामुळे कार्बन डायॉक्साईड निर्माण होतो. त्याच्या वासाने डास माग काढत येतात.
- बाटलीचा वरचा भाग उलटा करून खालच्या भागात पक्का बसवा.
- गरज असेल तर चिकटपट्टीचा वापर करा.
- बाटलीला बाहेरून काळा कागद गुंडाळा. काळा रंग डासांना आकर्षित करतो.
- आत गेलेले डास अडकून बसतात.
- बाटलीतील द्रावण २ आठवड्यानंतर बदला.
स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.