অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिक्षक प्रशिक्षण

शिक्षक प्रशिक्षण

दर्जा- शिक्षक प्रशिक्षण

MSCERT ही प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वृध्दिंगत करणारी आणि शैक्षणिक सहकार्य देऊ करणारी राज्यातील एक मध्यवर्ती संस्था आहे. अभ्यासक्रम निश्चित करणे, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाचे विकसन आणि निर्मिती, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी संशोधन आणि मूल्यमापन अशा अनेक जबाबदा-या MSCERT मार्फत पार पाडल्या जातात. शिक्षणाचा एकंदर दर्जा सुधारावा, यासाठी MSCERT ने विविध शिक्षक – प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत. ते पुढीलप्रमाणे:
  • मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे आणि शिक्षण हक्क अधिनियम, 2005, SCF 2010 मधील तरतुदींनुसार सेवाधीन शिक्षकांचे प्रशिक्षण
  • इयत्ता आणि विषयानुसार मूल्यमापन मानक संच विकसित करण्यासाठी ‘सातत्यपूर्ण एकात्मिक मूल्यमापनावर आधारित शिक्षक प्रशिक्षण’ आणि हे मूल्यमापन मानक संच वापरण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन
  • शाळेबाहेरील मुलांना शिक्षणशास्त्रानुसार, त्यांच्या वयाशी सुसंगत अशा योग्य इयत्तेत प्रवेश देण्यासंबंधीचे विशेष प्रशिक्षण
  • शिक्षण हक्क अधिनियम आणि संबंधित नियमांबाबत शिक्षक प्रशिक्षण
  • शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा प्रशिक्षण
  • अप्रशिक्षित शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण
या प्रशिक्षणांबरोबरच संस्था स्तरावरही राज्य शासनाने पुढील उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे.

  • आधुनिक शिक्षणशास्त्र, दृष्टिकोनानुसार अध्यापन करताना शिक्षकांसमोर येणा-या समस्या समजून घेण्यासाठी आणि DIET व्दारे सेवाधीन शिक्षकांसाठीच्या अभ्यासक्रमांच्या प्रभावाबाबत अभ्यास करण्यासाठी DIET मार्फत कृती संशोधन प्रकल्प राबवला जाणार आहे.
  • ‘कृतीमधून शिक्षण’ या दृष्टीकोनातून शाळांमध्ये अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी कृती आधारित अध्ययन कार्यक्रम राबवणे आणि विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनकार्ड, अध्ययन शिडी, गणित आणि विज्ञान संच अशा साधनांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देणे. या उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांमध्ये योग्य कौशल्ये आणि वेग विकसित होण्याबरोबच शाळेत कृती आधारित अध्ययन-अध्यापनाची संकल्पना वाढीला लागते.
  • BRC अधिकारी, विषय तज्ञांसाठी क्षमता उभारणी
  • परिवर्तन सुलभ प्रशिक्षण कार्यक्रमांचा विकास
  • परिषदा, चर्चासत्रे आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी MSCERT मध्ये सर्व सुविधांनी युक्त असे स्रोत केंद्र विकसित करणे.
  • MSCERT च्या परिसरात राज्यस्तरीय इंग्रजी, विज्ञान आणि गणित प्रयोगशाळेची निर्मिती
  • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी VPN केंद्रे उभारणे आणि दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययनाची संधी उपलब्ध करून देणे. यासाठी 407 शाळांसाठी ICT रचना आराखडा पुरवणे.

 

स्त्रोत : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate