(जे.ब्रूनर)
कार्यप्रवर्तकता विद्यार्थ्यांचे विद्यमान ज्ञान, विश्वास आणि कौशल्ये प्रकट करणारी ज्ञानार्जन नीती आहे. ह्या कार्यप्रवर्तक पध्दतीने, विद्यार्थी आधीचे ज्ञान व नवीन माहिती यांचे नवीन मिश्रण तयार करतात.
एक कार्यप्रवर्तक शिक्षक सर्व समस्यांवर उपाय करतो आणि विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे निरीक्षण करतो, विद्यार्थ्यांच्या शंकांचे मार्गदर्शन करतो आणि विचारांच्या नव्या पध्दतींना प्रोत्साहन देतो. नवीन डाटा/विवरण, प्राथमिक स्त्रोत, आणि परस्पर क्रियात्मक सामग्री यांच्यासह कार्य करणारे कार्यप्रवर्तक शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या डाटाप्रमाणे काम करावयास लावते आणि त्यांच्या स्वत:च्या संशोधनांना दिशा देण्यास मदत करते. अर्थातच, विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे विशाल, विस्तृत ज्ञानार्जन आहेसे वाटू लागते. प्रौढांसह, सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कार्यप्रवर्तक पध्दतीचा चांगला उपयोग होतो.
ज्ञानार्जन किंवा शिकणे ही एक सक्रिय प्रणाली आहे ज्यामध्ये विद्यार्थी त्याच्या स्वत:च्या पूर्वीच्या/सद्यस्थितील माहितीवर आधारित असलेल्या नवीन कल्पनांची रचना करतो ही ब्रूनरच्या सैध्दान्तिक संरचनेची मुख्य कल्पना आहे. विद्यार्थी संज्ञानात्मक संरचनेच्या आधारे माहिती निवडून तिचे रूपांतर करतो, कल्पनेची रचना करतो, आणि निर्णय घेतो. कार्यप्रवर्तक संरचना (जसे रूपरेषा, मानसिक प्रारूप) अनुभवांना अर्थ आणि संस्था प्रदान करते व व्यक्तीला ‘दिलेल्या माहितीच्या ही पुढे जाण्याची’ अनुमति देते.
निर्देशांचा संबंध विचारांत घेता, प्रशिक्षकाने विद्यार्थ्यांना सिध्दांतांचा शोध स्वत:च लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रशिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये एक सक्रिय संवाद असावा (जसे सॉक्रेटिक लर्निंग). विद्यार्थ्यांच्या सध्याच्या समजून घेण्याच्या स्थितीप्रमाणे उपयुक्त ठरेल अशा प्रकारे माहितीचे भाषांतर करणे हे प्रशिक्षकाचे काम आहे. अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे करण्यात आली पाहिजे की विद्यार्थी निरंतर त्यामध्ये आणखी भर घालत राहतील.
ब्रूनर (1966) च्या म्हणण्याप्रमाणे माहितीची कल्पनेने खालील चार मुख्य पक्षांना संबोधित करावे:
1. शिक्षणाबाबत आगाऊ कल
माहितीच्या कुशल हाताळणीत वाढ करण्यासाठी, नवीन संकल्पनांची निर्मिती व सरलीकरण करण्यासाठी ज्ञानाच्या रचनेकरीता चांगल्या पध्दती.
त्याच्या अलिकडील कार्यांमध्ये, ब्रूनर (1986, 1990, 1996) ह्याने त्याच्या ज्ञानार्जनाच्या सांस्कृतिक व सामाजिक पक्षांना घेरण्यासाठी तसेच कायद्याच्या अभ्यासाकरीता त्याच्या सैध्दांतिक संरचनेचा विस्तार केला आहे.
ब्रूनरच्या कार्यप्रवर्तक सिध्दांताची संकल्पना ही आकलनीय/संज्ञानात्मक अभ्यासावर आधारित माहितीसाठी असलेली एक सामान्य संरचना आहे. त्यातील बहुतांशी भाग बाल विकास संशोधनाशी (विशेषत: पायगेट) निगडीत आहे. ब्रूनर (1960) मधील कल्पना विज्ञान व गणित शिकण्यासंबंधी असलेल्या एका बैठकीवरून घेण्यात आल्या आहेत. ब्रूनरने किशोरवयीन मुलांसाठी गणित व सामाजिक ज्ञान कार्यक्रमाच्या संदर्भात त्याच्या सिध्दांताच्या विस्ताराचे स्पष्टीकरण केले. ब्रूनर, गुडनाव एण्ड ऑस्टिन (1951) मध्ये तर्कशक्ति प्रणालीच्या संरचनेच्या मूळ विकासाचे वर्णन केलेले आहे. ब्रूनर (1983) किशोरवयीन मुलांच्या भाषा शिकण्यावर जास्त केंद्रित आहे.
लक्षात घ्या की कार्यप्रवर्तकता ही विज्ञान आणि तत्त्वज्ञानातील एक विस्तृत सैध्दांतिक संरचना आहे आणि ब्रूनरचा सिध्दांत एका विवक्षित परस्परसंबंधाचे प्रतिनिधित्व करतो.
उदाहरण: हे उदाहरण ब्रूनर (1973) मधून घेण्यात आले आहे:
‘अविभाज्य अंकांची संकल्पना मुलांना चटकन् कळणारी आहेसे वाटते, जेव्हां रचनेच्या द्वारे, मुलास हे कळते की मूठभर शेंगा दिलेल्या उभ्या आणि आडव्या वाफ्यांमध्ये पेरल्या जाऊ शकत नाहीत. अशा प्रकारच्या मात्रा फक्त एकाच फाइलमध्ये टाकल्या जाऊ शकतात किंवा एखाद्या अपूर्ण रो-कॉलमच्या डिझाईनमध्ये ज्यामध्ये नेहमीच एक जास्तीची किंवा एक अशी की ज्यामध्ये भरण्यासाठी अगदी थोडी जागा असेल. हे नमुने, मूल शिकते, त्याला प्राइम म्हणतात. ह्या पायरीवरून मात्रांच्या पूर्ण केलेल्या मल्टिपल कॉलम आणि रोमधील, तथा कथित, रेकॉर्ड शीटपर्यंत पोचणे मुलासाठी सोपे असते. येथे संरचनेत विघटन, गुणन आणि प्राइम दिसून येतात.’
स्त्रोत: tip.psychology.org/bruner.html
अनुभवात्मक शिक्षण सिध्दांत (ईएलटी) (ELT) ज्ञानार्जन प्रणालीला एक आध्यात्मिक व विकासाचे बहुपटलीय प्रारूप देते, ज्या दोहोंचा ही संबंध लोकांसंबंधी आपणांस माहित असलेल्या शिक्षण, वाढ आणि विकासाशी निगडित आहे. ह्या सिध्दांतास शिक्षण प्रणालीतील अनुभवांच्या केंद्रीय भूमिकेवर बळ देण्यासाठी ‘अनुभवात्मक शिक्षण’ असे म्हणतात. ह्यामुळे इतर शिक्षण प्रणालींपासून ईएलटीचा वेगळेपणा दिसून येतो. ‘अनुभवात्मक’ हा शब्द ईएलटीला संज्ञानात्मक शिक्षण सिध्दांत, ज्यांचा भर संज्ञानात्मक सिध्दांतावर, आणि वर्तनीय शिक्षण सिध्दांत जो शिक्षण प्रणालीमध्ये कोणत्या ही आत्मनिष्ठ अनुभवाची भूमिका नाकारतो, यांच्यावर अवलंबून आहे.
अनुभवात्मक शिक्षण सिध्दांत शिक्षणाला अशा प्रकारे परिभाषित करतो, ‘अशी प्रणाली ज्यायोगे अनुभवांचे रूपांतर होते व ज्ञानाची रचना होते. आकलनशक्ती आणि अनुभवांच्या रूपांतराच्या मिश्रणाचा परिणाम ज्ञान होय’.
रॉजरने दोन प्रकारच्या शिक्षणांची विविधता दाखविली: संज्ञानात्मक (अर्थहीन) व अनुभवात्मक (महत्त्वपूर्ण). तो शैक्षणिक ज्ञानाबद्दल बोलतो जसे शब्दावली शिकणे किंवा पाढे पाठ करणे आणि नंतर प्रत्यक्ष ज्ञानाचा संबंध सांगतो जसे कार दुरूस्त करण्यासाठी इंजिनाचा अभ्यास करणे. अनुभवात्मक शिक्षण हेच शिकणार्याच्या इच्छा व गरजांना संबोधित करते आणि हीच श्रेष्ठत्वाची गुरूकिल्ली आहे. रॉजरने अनुभवातमक शिक्षणाच्या गुणवत्ता अशा प्रकारे दिल्या आहेत: वैयक्तिक सहभाग, स्व-पुढाकार, शिकणार्याच्याद्वारे मूल्यांकन, आणि शिकणार्यावर पडणारा प्रसृत प्रभाव.
रॉजरसाठी, अनुभवात्मक शिक्षण हे वैयक्तिक बदल व वाढ यांच्यासारखेच आहे. रॉजरला असे वाटते की सर्व मनुष्यप्राण्यांची शिकण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते; अशा शिक्षणास सुविधा पुरविण्याची भूमिका शिक्षकाची असते. ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
1. शिकण्यासाठी एक सकारात्मक वातावरण तयार करणे,
2. विद्यार्थ्या (र्थ्यांच्या) च्या उद्देशास स्पष्ट करणे,
3. शिक्षणाची साधने उपलब्ध करविणे आणि त्यांचे आयोजन करणे,
4. शिक्षणाचे बुध्दिमत्तापूर्ण व भावनात्मक घटक यांचा समतोल राखणे, आणि
5. वर्चस्व न गाजविता विद्यार्थ्यांचे विचार व संवेदनांमध्ये सहभागी होणे.
1. विद्यार्थी शिक्षण प्रणालीत पूर्णपणे सहभागी होतो आणि त्याच्या स्वभावावर आणि
दिशेवर त्याचे पूर्ण नियंत्रण असते,
2. हे प्राथमिकरीत्या प्रात्यक्षिक, सामाजिक, वैयक्तिक आणि संशोधन समस्यांना सामोरे
जाण्यावर आधारित असते, आणि
3. स्व-मूल्यांकन ही यशाचे किंवा प्रगतीचे मूल्यांकन करण्याची मुख्य पध्दत आहे. शिकून घेणे शिकण्याचे महत्व आणि परिवर्तनाबाबत उदात्तपणा ह्यावर रॉजर भर देतो.
अनुभवात्मक शिक्षण ही एक उच्च महत्त्वपूर्ण शिक्षण पध्दत ठरू शकते. ही पध्दत विद्यार्थ्यास त्याच्या इच्छा व गरजांना संबोधित करून वैयक्तिक पातळीवर त्याला सहभागी करून घेते. स्व-पुढाकार आणि स्व-मूल्यांकन अनुभवात्मक शिक्षणासाठी आवश्यक असलेले गुण आहेत. अनुभवात्मक शिक्षण प्रभावी ठरावे म्हणून, संपूर्ण शिक्षण चक्र वापरायला हवे, ज्यामध्ये लक्ष्य निर्धारणापासून, अवलोकन आणि अनुभव घेण्यापर्यंत ते, पुनरावलोकन करून, आणि शेवटी योजना अमलांत आणण्यापर्यंत सर्व असते. ही संपूर्ण प्रक्रिया नवीन कौशल्ये शिकविते, नवीन दृष्टिकोण किंवा अगदी संपूर्ण नवीन विचारसरणी देखील देते.
आपण लहान होतो तेव्हांचे खेळ आठवतात का? सोपे खेळ, जसे लंगडी खेळणे, हे तुम्हांला पुष्कळशा मौल्यवान शैक्षणिक आणि सामाजिक कुशलता शिकविते, म्हणजे गट प्रबंधन किंवा टीम मॅनेजमेंट, इतरांशी बोलणे-संभाषण-संपर्क इत्यादि आणि नेत्तृत्व. अनुभवात्मक शिक्षण तंत्रात खेळ लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे त्यांतील ‘गंमत’ होय-खेळांच्या माध्यमाने शिकलेल्या गोष्टी फार काळापर्यंत लक्षांत राहतात.
पुष्कळसे शिकविणारे शिक्षण पध्दतीमध्ये खेळसंचे महत्व जाणतात. एक खेहकर वातावरण, जेथे हास्य खळाळत असते आणि विद्यार्थ्याच्या योग्यतांबद्दल आदर बाळगला जातो, अनुभवात्मक शिक्षणाचे एक प्रभावी वातावरण ठरते. अनुभवात्मक शिक्षणात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खेळात सहभागी होऊ देणे हे फार महत्वाचे आहे, म्हणजे त्यांचा समजूतदारपणा वाढून मिळालेली माहिती ते फार जास्त काळपर्यंत लक्षांत ठेवतात.
1. जेव्हां विद्यार्थ्याच्या वैयक्तिक आवडीशी संबंधित विषय असेल तेव्हांच महत्वपूर्ण
शिक्षण जुळून येते
2. स्वत:लाच कष्टकारक ठरणारे शिक्षण (उदा. नवीन दृष्टिकोन किंवा परस्परसंबंध)
बाह्य धोके कमी असल्यावर जास्त चांगल्या प्रकारे सहन केले जातात
3. स्वत:ला कमी धोका असल्यावर लवकर शिकता येते
4. स्व-पुढाकार असलेले शिक्षण नेहमीच जास्त काळपर्यंत टिकणारे आणि विस्तृत असते.
मनुष्यप्राणी अवलोकन करून, निर्देश ऐकून, आणि इतरांची नक्कल करूनसुध्दा दक्षतेने शिक्षण घेऊ शकतो. ‘संज्ञानात्मक शिक्षण हे ऐकणे, पाहणे, स्पर्श करणे आणि अनुभव घेणे ह्यांचा परिणाम आहे.’
संज्ञानात्मक शिक्षण ही ज्ञानप्राप्तीची सर्वांत सशक्त यंत्रणा आहे, आणि इतरांच्ी नक्कल करण्यापलिकडे जाते. परिस्थितीजन्यता तुम्ही आमच्या वेबसाईट वाचून काय शिकलांत ते सांगू शकत नाही. हे शिक्षण संज्ञानात्मक शिक्षणाचे महत्व स्पष्ट करते.
संज्ञानात्मक शिक्षणाची परिभाषा म्हणजे मानसिक किंवा संज्ञानात्मक प्रणालीद्वारे ज्ञान आणि कुशलतांची प्राप्ती होय, त्या पध्दती ज्यांचा उपयोग आपण ‘आपल्या डोक्यांमध्ये’ माहिती/सूचना हाताळण्यासाठी करतो. संज्ञानात्मक पध्दतींमध्ये प्रत्यक्ष वस्तू आणि प्रसंगांचे मानसिक प्रतिनिधित्व, आणि माहिती प्रोसेसिंगची इतर स्वरूपे यांचा समावेश असतो.
संज्ञानात्मक शिक्षणात, ऐकणे, पाहणे, स्पर्श करणे, वाचणे आणि अनुभव घेणे यांपासून आणि नंतर माहितीचे प्रोसेसिंग करून आणि स्मरण करून व्यक्ती शिकते. संज्ञानात्मक शिक्षण हे अप्रत्यक्ष शिक्षण देखील म्हणविले जाऊ शकते, कारण ह्यामध्ये स्वयंचलित हालचाली नसतात. तथापि, शिकणारा हा अत्यंत सक्रिय असतो, संज्ञानात्मक स्वरूपात, नवीनच मिळालेल्या माहितीचे प्रोसेसिंग व ती पाठ करणे ह्यामध्ये कुशल असतो.
संज्ञानात्मक शिक्षण आपल्याला एका जटिल संस्कृतीचे संप्रेषण व रचना करण्यास योग्य बनविते ज्यामध्ये चिन्हे किंवा प्रतीके, मूल्ये, आस्था आणि ठराविक पध्दतींचा समावेश असतो. संज्ञानात्मक गतिविधि ही पुष्कळशा प्रकारे मानवी वर्तनाशी निगडित असल्याने असे मानले जाते की ही संज्ञानात्मक गतिविधि फक्त मनुष्य प्राण्यातच आढळते. तथापि, प्राण्यांच्या काही विविध प्रजाती आकलनशक्तीच्या माध्यमाने शिकण्यास समर्थ असतात. उदाहरणार्थ, प्राणीसंग्रहालयातील माकड किंवा वानर, क्वचित एखाद्या माणसाची किंवा इतर माकडांची नक्कल करते.
6ई+एस निर्देशांचे प्रारूप
6 ई व एस (एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॅबोरेट, इव्हॅल्युएट, एक्सटेंड आणि स्टँन्डर्डस्) लेसन प्लॅन प्रारूपाचा विकास शाळांमधील शिक्षकगणांशी चर्चा करूनच करण्यात आला आणि हे शिकविण्याच्या कार्यप्रवर्तक प्रारूपावरच आधारित आहे. लेसन प्लॅनस् कार्यप्रवर्तक निर्देशात्मक प्रारूपांवर गतिविधि व योजनेच्या चरणांसह संरचित असून विद्यार्थ्यांनी वर्तमान कालीन ज्ञानाचा कळस गाठावा ह्यासाठी नवीन ज्ञानात निरंतर भर घालण्यावर (किंवा रचनेवर) आधारित आहेत.
6 ईंमधील प्रत्येक ई शिकण्याबाबतच्या एका चरणाचे वर्णन करतो, आणि प्रत्येक चरण किंवा पायरी ईपासूनच सुरू होते. ई - एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॅबोरेट, इव्हॅल्युएट, एक्सटेंड. हे 6 ई विद्यार्थी व शिक्षकांना सामान्य गतिविधिंचा अनुभव घेण्यास, पूर्वज्ञान आणि अनुभवांची बांधणी व उपयोग करण्यास, अर्थ निर्माण करण्यास, आणि त्यांच्या एखाद्या संकल्पनेच्या समजूतदारपणाचे सतत मूल्यांकन करण्यास मदत करतात,
एंगेज
‘एंगेज’ गतिविधिद्वारे पूर्व व वर्तमानकालीन शिक्षण अनुभवांची जोडणी करता आली पाहिजे, वर्तमान गतिविधिंच्या परिणामांबाबत विद्यार्थ्यांच्या विचारसरणीचा आढावा घेऊन त्यावर केंद्रित होता यायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षित होण्यासाठी मानसिक स्वरूपात संकल्पना, प्रक्रिया, किंवा कौशल्य यांच्यात एंगेज व्हायला पाहिजे. प्रत्येक लेसन प्लॅनमध्ये एक ‘अत्यावश्यक प्रश्न’ असतो जो त्यांच्या मूळ चौकशीकरीता आधार ठरतो. सामान्यपणे ह्या सेक्शनमध्ये काही महत्वपूर्ण प्रश्न असतील ज्यायोगे तुम्हांला एक्सप्लोर सेक्शनमधील काही संशोधनाबाबत मदत करतील.
एक्सप्लोर
येथे विद्यार्थी जास्त पध्दतशीरपणे विषयाचे अन्वेषण करतो. येथे महत्वाचे म्हणजे असे की विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्या मार्गाचे ‘स्वतंत्र चक्र’ साधनांच्या स्वरूपात दिले जाते आणि कोणता ही निर्देश दिला जात नाही. त्यांना काही निर्देशांची गरज भासेल आणि शिक्षक फिरत राहून, महत्वाचे प्रश्न विचारून, त्यांचे आपसांतील संभाषण ऐकून आणि ते काम करीत आहेत ह्याची दक्षता घेईल.
एक्सप्लेन
ह्या चरणांत विद्यार्थ्यांना ते संशोधन करीत असलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण करण्यास मदत मिळते. त्यांना त्यांच्या संकल्पनात्मक समजूतदारपणाचे वर्णन करण्याची किंवा त्यांचे नवीन कौशल्य किंवा आचरण दाखविण्याची संधी मिळते. ह्या चरणांत शिक्षकांना देखील औपचारिक शब्द, परिभाषा/व्याख्या, आणि संकल्पनांचे स्पष्टीकरण, प्रक्रिया, कौशल्ये किंवा आचरण दाखविण्याची संधी मिळते.
एलॅबोरेट
येथे विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेले काम प्रत्यक्ष करावे ही अपेक्षा असते. त्यांचे स्वत:चे शोध व नवीन माहितीचे कार्यान्वयन इतरांसमोर ठेवण्याची ही त्यांना एक संधी असते. मूल्यांकनासाठी सामग्री देण्याची, नेमून दिलेले काम पूर्ण करण्याची आणि प्रस्तुतीकरण देण्याची ही उपयुक्त संधी असते.
इव्हॅल्युएट
जेथे ह्या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान मूल्यांकन चालू राहावे अशी अपेक्षा असते, तेथे हेच ते सेक्शन आहे जेथे किती शिक्षण ग्रहण करण्यात आले ह्याचे मूल्यांकन शिक्षक करतात. सामान्यपणे विद्यार्थी आपल्या असाइनमेंटस् ह्या वेळी शिक्षकांना सोपवितात. ह्या वेळी विद्यार्थ्यांना स्व-मूल्यांकन, समूह/गट मूल्यांकन आणि त्यांनी स्वत:ची साधने विकसित करावीत ह्यासाठी प्रोत्साहन देणे फार गरजेचे असते.
एक्सटेंड
ह्या सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना लेसन/धड्याच्या ही पलिकडे घेऊन जाणार्या सूचना असतात. ह्या मागचा उद्देश नवीन आणि अपरिचित परिस्थितींच्या दरम्यान त्यांचा समजूतदारपणा कसा दिसून येतो ते पहाणे व त्यांचे शोध इतरांसमोर कशा प्रकारे ठेवतात ते पाहणे हा असतो. साधारणपणे, ह्या प्रकारची गतिविधि त्यांनी जे काही प्राप्त केले त्यामुळे त्या उत्कंठेमुळे विकसित होईल. हे सेक्शन विद्यार्थीचलित आहे, तथापि शिक्षक हळुवारपणे सुचवितात की विद्यार्थ्यांनी त्यांचे काम एखाद्या प्रतिस्पर्धेला द्यावे किंवा त्यांच्या स्वत:च्या शाळेबाहेरील इतर जागी प्रदर्शनास न्यावे.
मानदंड
लेसन प्लॅन ते लेसन प्लॅन, ह्याप्रमाणे मानदंड सध्या एकत्रित व्हायच्या प्रक्रियेत आहेत. ह्या सेक्शनमध्ये, धडे/लेसनची जुळणी राज्य, प्रादेशिक आणि/किंवा राष्ट्रीय मानदंडाशी करण्यात येते. हे प्राथमिक पातळीवर शिक्षकांच्या माहितीसाठी आहे आणि स्थानिक मंडळात, जिल्ह्यात किंवा शालेय अभ्यासक्रमात आवश्यक ती माहिती देण्यासाठी आहे.
स्त्रोत: www.nortellearnit.org
परस्परक्रियात्मक शिक्षण नीती जसे भूमिका वठविणे व सोंगे करणे ह्यासारखी कामे तेव्हांच उत्तम ठरतात जेव्हां ती विद्यार्थ्यांना सहज देण्यात येतात. भूमिका वठविण्याचा प्रभावी उपयोग, तथापि, तयारी हवी असते, एक सुपरिभाषित प्रारूप, स्पष्टपणे परिभाषित करण्यात आलेले लक्ष्य आणि परिणाम, आणि सोंग केल्या नंतर थोडा-सा वेळ संक्षिप्त चर्चेसाठी. भूमिका वठविणे आणि सोंगे करणे ह्यापासून विद्यार्थ्यांनी त्यांना अवगत असलेल्या माहितीचा उपयोग करावा हे आवश्यक असते. ह्या प्रक्रियेत, ते महत्वपूर्ण विचार आणि सहकारितापूर्ण शिकणे ह्यास प्रोत्साहन देतात. ही शिक्षण साधने विद्यार्थ्यांना दृष्टिकोन आणि संकल्पना स्पष्ट करण्यास मदत करतात आणि वास्तविक विश्व प्रसंग व सारांशित संकल्पना यांच्यात दुवा जोडण्यासाठी मदत करतात.
एका बहु-वय वर्गात, विद्यार्थ्यांच्या वैविध्याचा फायदा उचलून शिक्षणास प्रोत्साहन दिले जाते. युनिटचे आयोजन प्रतिपाद्य विषयाप्रमाणे करण्यात येते, आणि युनिटच्या आंतच प्रत्येक ग्रेड पातळीवर वेगवेगळ्या असाइनमेंटवर काम करतात. विद्यार्थ्यांना एकमेकांस खेळीमेळीच्या वातावरणात मदत करण्यास प्रोत्साहन देण्यात येते आणि वेगवेगळ्या वयोगटातील आणि पात्रता पातळीच्या विद्यार्थ्यांतील भिन्नतांचा विचार केला जातो. सहकारी कामांत, लहान वयाच्या विद्यार्थ्यांसाठी जुने विद्यार्थी आदर्श व सदुपदेशक ठरतात.
बहु-वय वर्गांमध्ये शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांची विविध वयांना संबोधित करण्यासाठी, ग्रुपिंगच्या नवीन नमुन्यांचे लवचिक कार्यान्वयन करण्यासाठी, विशिष्ट शिक्षण लक्ष्यपूर्तीसाठी, सर्व विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी, तसेच स्वत:साठी आणि परस्परांसाठी मनामध्ये आदराची भावना राखण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते.
सर्व प्रकारच्या शिक्षक-नीतींमधील उत्तम संशोधित नीती ही सहकारी शिक्षण होय. ज्या विद्यार्थ्यांना एकत्रपणे शिकण्याची संधी मिळते, ते लवकर आणि दक्षतेने शिकतात, त्यांची संग्राह्य शक्ती वाढते, आणि ते शिक्षण घेण्याच्या अनुभवाबाबत जास्त सकारात्मक असतात. याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून त्यांना एक प्रकल्प पूर्ण करण्यास सांगतात. समूह भावनेने कार्य करून यशस्वी होण्यासाठी पुष्कळशा पध्दती आहेत, पण शिक्षक व विद्यार्थी अशा दोघांना ही त्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. अलिकडेच ह्या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणात दुरूपयोग करण्यात आल्याबद्दल टीका करण्यात आली होती. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास, ही पध्दत अशी नाही की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे गट काम करीत आहेत व शिक्षक पेपर तपासत असून ‘गेट ऑफ द हुक’ (अंग झाडून मोकळे होणे किंवा अलिप्त राहणे) असतात. ‘गिफ्टेड’ विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या गटांचा इनचार्ज नेमून सतत त्यांच्या गरजांना संबोधित करण्याचा हा मार्ग नव्हे. विद्यार्थ्यांनी अंर्तवैयक्तिक जीवन-कौशल्ये शिकावीत आणि त्यांच्या समूह भावनेने कार्य करण्याच्या योग्यतेचा विकास व्हावा ह्यासाठी असलेला हा मार्ग आहे – असे कौशल्य आजच्या काळात कार्यस्थळी सर्वांत जास्त आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आळीपाळीने विविध भूमिका पार पाडाव्यात जसे फॅसिलिटेटर, रिपोर्टर, रेकॉर्डर इत्यादि ह्यासाठी हा मार्ग आहे. एका सहकारी गटामध्ये, प्रत्येक विद्यार्थ्याचे एक विशिष्ट कार्य असते, प्रत्येकाने शिकण्यामध्ये किंवा प्रकल्पात सहभागी व्हायचे असते, आणि कोणी ही ‘पिगीबॅक’ (पाऊल मागे घेणे) करू शकत नाही. गटाचे किंवा समूहाचे यश हे प्रत्येकाच्या यशस्वी कामावर अवलंबून असते.
स्वत:ला व आपल्या गटातील सहकारीगणास शिकण्यास मदत करण्यासाठी विद्यार्थी शैक्षणिक कार्यांमध्ये एकत्रितपणे काम करतात. सर्व साधारणपणे, सहकारी शिक्षण पध्दतीत खालील पांच लक्षणांचा समावेश असतो.
शिकण्याच्या पध्दती म्हणजे शिकण्याचे विविध प्रकार किंवा मार्ग होय.
शिकण्याच्या पध्दतीच्या प्रकार कोणते?
व्हिज्युअल लर्नर्स: पाहून शिकणारे......
एखाद्या धड्यातील घटक पूर्णपणे समजण्यासाठी या व्यक्तीना शिक्षकाच्या शारीरिक हावभाव व चेहर्यावरील भाव बघण्याची गरज असते. वर्गामध्ये सर्वांत पुढे बसण्याकडे त्यांचा कल असतो ज्यायोगे त्यांना निरीक्षण करण्यात किंवा पाहण्यात अडथळे येणार नाहीत (उदा, लोकांची डोकी). ते चित्रात्मक पध्दतीने विचार करतात आणि दृष्यमान प्रदर्शनांमधून शिकतात: जसे, आकृत्या, सचित्र पुस्तके, उंचीवरील पारदर्शकता/दृष्यमानता, व्हिडिओ, फ्लिपचार्टस् आणि हैंडआउटस्. एखाद्या व्याख्यानाच्या किंवा वर्गचर्चेच्या दरम्यान, या व्यक्ती लर्नर्स माहिती गोळा करण्यासाठी नोटस् लिहून घेणे रास्त समजतात.
ऑडिटरी लर्नर्स: ऐकून शिकणारे.......
ते मौखिक भाषणे किंवा व्याख्याने, चर्चा, आणि इतर लोक काय बोलत आहेत त्यातून शिकतात. ऐकून शिकणारे भाषणाच्या दरम्यान येत असलेल्या आवाजाची टीप, लकब, गति, आणि इतर वैशिष्ट्ये लक्षांत घेऊन शिकतात. लेखी माहिती ऐकल्याशिवाय त्याला फारसे महत्व नसते. या व्यक्ती धडे मोठ्याने वाचून आणि टेप रेकॉर्डरचा वापर करून शिकतात.
गतिशास्त्रक्षम/स्पर्शजन्यताक्षम लर्नर्स : : हालचाली, क्रिया व स्पर्श यांच्या माध्यमाने शिकतात.......
गतिशास्त्रक्षम/स्पर्शजन्यताक्षम लर्नर्स त्यांच्या भोवती असलेल्या भौतिक विश्वाला हस्तस्पर्शाद्वारे जाणून घेऊन सक्रियपणाने शिकतात. एका जागी जास्त वेळ बसणे त्यांना जड जाऊ शकते आणि हालचाल करण्याच्या व शोध घेण्याच्या त्यांच्या शरीरिक गरजेमुळे त्यांचे लक्ष न लागणे असे प्रकार होऊ शकतात.
स्त्रोत: ldpride
अंतिम सुधारित : 7/29/2020
शिक्षण हक्क अधिनियम
भारतातील विभिन्न संस्थांमध्ये प्रवेश
बहुविध कौशल्य सिध्दांत यात दृष्यमान/मर्यादित आक...
आपला भारत देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो हे आपल...