অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेबिज - लक्षणे आणि उपाय

रेबिज - लक्षणे आणि उपाय

  • v रेबिज (पिसाळणे) हा रोग अत्यंत घातक व महाभयंकर आहे.
  • v हा आजार मानवाला, सस्तन पशुंना (मुख्यतः कुत्र्यांना) झाला, तर खूप हाल होऊन त्यांना मरण येते.
  • v रेबिज रोगावर कोणतेही खात्रीलायक औषधपाणी नाही, हे लक्षात ठेवा.
  • v रेबिज होऊ नये, यासाठी प्रतिबंधक लस टोचून घेणे, हाच एकमेव इलाज आहे.
  • v रेबिज हा रोग अतिसूक्ष्म विषाणूंपासून (व्हायरस) होतो. हा विषाणू फक्त हाय-पॉवर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक  यंत्राखालीच दिसतो.
  • v हा रोग मज्जासंस्थेशीच (नर्व्हस सीस्टिम) निगडित असल्याने तो रक्तात दिसत नाही. मज्जारज्जुमार्फत (चेता संस्था) हा विषाणू ‘मेंदूत’ पोहोचल्यानंतर शरीरात त्याचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगाची लक्षणे दिसण्यास तीन दिवस ते चारशे दिवसांपेक्षाही अधिक अवधी लागू शकतो. (याला ‘इनक्युबेशन पिरीअड’ म्हणतात)
  • v रेबिजचा प्रसार कुत्र्याबरोबरच इतर पशूंच्या आणि मानवाच्या लाळेमार्फत होतो. म्हणून घरातील/बाहेरील कुत्र्या-मांजराचे पापे-मुके घेऊ नयेत.
  • v घरातील पाळीव कुत्र्या-मांजराला दर साडे-पाच महिन्यांनी ‘रेबिज प्रतिबंधक लस’ न चुकता, न विसरता द्यावी. प्राण्यांना लस देताना ती थंड अवस्थेत असली पाहिजे.
  • v कोणत्याही कुत्र्याने किंवा मांजराने चावले असता किंवा ओरबाडले असता, ती जागा साबणाने 8 ते 10 वेळा घासून-पुसून स्वच्छ करावी. (तो साबण कपड्याचा असेल तर उत्तम.) त्यावर टिंक्चर आयोडिन, अल्कोहोल, संपृक्त डेटॉल भरपूर प्रमाणात लावावे. त्या जागेवर कापूस, चिकटपट्टी तसेच बँडेज बांधू नये.
  • v चाव्यामुळे किंवा ओरबडण्यामुळे खोलवर जखम झाली असेल, तर वरीलप्रमाणे ती जखम स्वच्छ करून जखमी व्यक्तीला ताबडतोब (2 ते 3 तासांत) कोणत्याही शासकीय, महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात न्यावे.
  • v घरातील पाळीव कुत्र्यांची किंवा मांजराची वागणूक नेहमीच्या माणसांबरोबर थोडीही वेगळी दिसली, तरी ताबडतोब नजीकच्या पशुपक्षी डॉक्टारांशी संपर्क साधावा.
  • v मेंदूच्या जवळ (म्हणजे चेहरा, मान, खांदे) जखम असेल, तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा. जखम स्वच्छ करून घ्यावी.
  • v गोठ्यातील गायी-गुरांना, बाहेरील वा घरातला कुत्रा चावला, तर त्याची योग्य दखल वेळीच घ्या. नाही तर महागात पडेल. वटवाघळापासूनही दक्ष राहावे.

 

संपर्क : 9370 1457 60

डॉ. वासुदेव सिधये

पशुचिकित्सा तज्ज्ञ

पुणे

स्त्रोत - वनराई जुलै २०१५

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate