हिपॅटायटीस हा शब्द यकृताचा दाह निर्माण करणा-या रोगांच्या समुच्चयाला दिला जातो, यात, विषाणू आणि तीव्र मद्यपान यांच्यामुळे होणारा दाह समाविष्ट आहे. हिपॅटायटीसला कारणीभूत ठरणा-या विषाणूंमधे हिपॅटायटीस अ, ब, क आणि ई आणि डेल्टा फॅक्टर यांचा समावेश आहे. प्रत्येक विषाणू हा एक विशिष्ट सिंड्रोमला कारणीभूत असतो, तथापि काही लक्षणे आणि परिणाम हे समानच आहेत.
हिपॅटायटीस ब चे संक्रमण झालेले बहुतांश रुग्ण त्यापासून ६ महिन्यांच्या आत मुक्ती मिळवतात. एक अल्प संक्रमण हे हिपॅटायटीस ब चं तीव्र प्रकरण समजलं जातं.
हिपॅटायटीस ब हा रक्त आणि इतर शारीरिक द्रावामार्फत पसरतो. पुढीलप्रकारे संक्रमण होऊ शकतेः
लागणीचा उच्च धोका असलेल्या आरोग्य कार्यकर्त्यांसह इतर व्यक्ती आणि हिपॅटायटीस झालेल्या व्यक्तीसोबत राहणा-या व्यक्तींनी हिपॅटायटीस ब ची लस टोचून घ्यावी.
तीव्र हिपॅटायटीसमधे, संक्रमण झाल्यापासून लक्षणे दिसू लागेतोवर 1-6 महिन्याचा कालावधी लागतो. प्रारंभिक लक्षणांमधे, मळमळणे आणि उलट्या, भूक न लागणे, थकवा आणि स्नायू तसंच सांधेदुखी यांचा समावेश होतो. कावीळ, यासोबत, गडद लघवी आणि पातळ मल होतो. या प्रारंभिक टप्प्यात अंदाजे एक टक्का लोक यकृताचे नुकसान झाल्याने प्राणाला मुकतात.
तीव्र स्वरुपाचे संक्रमण होणे हे संक्रमणाच्या वेळी त्या व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते. नवजात बाळांपैकी 90 टक्के, 50 टक्के मुलं आणि 5 टक्क्याहून कमी प्रौढ यांना तीव्र स्वरुपाचा हिपॅटायटीस ब होतो.
या रोगामुळे सर्वाधिक नुकसान हे शरीराने संक्रमणाला दिलेल्या प्रतिसादामुळे होते. संक्रमित यकृत पेशींना (हिपॅटोसाईट्स) शरीराच्या प्रतिकार यंत्रणेनं दिलेल्या प्रतिसादामुळं त्या पेशींचे नुकसान होते आणि यकृताचा दाह होतो. परिणामी, यकृतातील वितंचक (ट्रान्समिनेसेस) यकृतातून बाहेर गळून रक्तात मिसळतात, आणि वितंचकांची रक्तातील पातळी वाढते. रक्त गोठवणारा घटक, प्रोथ्रॉम्बिन निर्माण करण्याची यकृताची क्षमता हा विषाणू बिघडवतो, त्यामुळे रक्त गोठण्यासाठी लागणारा वेळ वाढतो.
यकृताचे नुकसान झाल्याने, शरीर स्वतःला बिलीरुबीनपासून (जुन्या लाल रक्तपेशी मोडण्यातून निर्माण झालेला पदार्थ) मुक्त करण्याची क्षमता हरवते, त्यामुळं कावीळ (डोळे आणि शरीराचा रंग पिवळा होतो) आणि गडद लघवी होते.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/2/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...