मुलीकडे अजूनही ओझ म्हणून पहिले जाते.मानसिकता दूर करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यात शासन कमी पडत आहे. म्हणून मुख्य जबाबदारी ही आपल्या सर्वांचीच आहे. स्त्रियांची सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण करण्यात शासन कमी पडले आहे. मुलीचे समाजातील स्थान उंचावणे, शिक्षण, आर्थिक सुरक्षितता देणारा रोजगार उपलब्ध असणे यावर मुलीही हव्या असणे अवलंबून आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा असूनही त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही. तसेच कायद्यांतर्गत स्थापन करावयाच्या समित्या आणि त्यांच्या कार्यवाहीबाबतही शासन उदासीन आहे. याला तीन घटक जबाबदार आहेत. शासन संपत्ती घरातून बाहेर जाऊ नये, धार्मिक संस्कारांसाठी मुलगाच हवा या मानसिकतेमुळे मुली नकोशा झालेली कुटुंबेही यासाठी जबाबदार आहेत आणि पैशासाठी अशा तपासण्या करणारे आणि मुलगी असेल तर गर्भपात करणारे खाजगी डॉक्टर व दवाखाने सुद्धा याला जबाबदार आहेत.
गर्भलिंगनिवडीला विरोध करताना भ्रूणहत्या स्त्रीभ्रूणहत्या हे शब्द अजिबात वापरू नयेत. गर्भपात हा स्त्रियांचा अधिकार आहे हे कायम लक्षात असू दया. जगभरातल्या स्त्री चळवळीने सुरक्षित गर्भपाताच्या अधिकारासाठी संघर्ष केला आहे. कारण जिथे स्त्रियांना शरीरसंबंध किती मुलं हवी कधी हवी अशा बाबतीत निर्णयावर स्त्रीचे नियंत्रण राहू शकते आणि म्हणूनच स्त्रियांसाठी हा अधिकार खूप महत्त्वाचा आहे. हत्या म्हटल्याने या अधिकारावर गदा येते. हत्या म्हणजे खून आणि खून हा गुन्हा यातून अपराधी असल्याची भावना निर्माण होते.
समाजातील स्त्रियांचे दुय्यम स्थान आणि वाढती विषमता या संदर्भात स्त्रिया गर्भलिंग निवडीचा पर्याय वापरतात. स्त्रिया गर्भपाताचा निर्णय घेतात तेव्हा इतर पर्याय उपलब्ध नसतात. गर्भपाताचे स्त्रीच्या शरीरावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. भारतामध्ये २० आठवड्यांपर्यंत गर्भपाताला परवानगी आहे. पण १२ आठवड्यानंतर केल्या जाणाऱ्या गर्भपातासाठी दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक आहे. मुलीचा गर्भ आणि त्यामुळे केले जाणारे गर्भपात बेकायदेशीरपणे आणि उशीरा म्हणजे अगदी सातव्या महिन्यामध्ये केले जात असल्याचे दिसून आले आहे. हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
१९९४ साली गर्भलिंगनिदानाला आळा घालण्यासाठी एक कायदा आला. त्यानंतर २००३ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. या कायदयानुसार गर्भधारणेच्या व प्रसूतीच्या आधी पोटातील गर्भाचे लिंग जाणून घेणे आणि तशी तपसणी करणे हा गुन्हा मानण्यात आला आहे. सोनोग्राफीसारख्या इतर काही तंत्राच्या वापरावरही हा कायदा नियंत्रण ठेवतो. आपल्या भागातल्या कोणत्या दवाखान्यात जर अशी तपासणी करत असतील तर त्याविरोधात आपण या कायद्याचा वापर करू शकतो.
प्रत्येक बीजामध्ये काही धागे असतात. या धाग्यांवरून होणारे बाळ कसे असेल ते ठरते. त्यांना गुणसूत्र म्हणतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवर ठरते की होणारे बाळ मुलगा असणार की मुलगी.
स्त्री बीजामध्ये (क्ष) X गुणसूत्र असते.
पुरूषबीज दोन प्रकारची असतात.
त्यामध्ये (क्ष) X (य) Y ही दोन्ही गुणसूत्रे असतात.
पुरुषांकडून जर (क्ष) X मिळाला तर मुलगी होणार आणि पुरुषांकडून (य)Y मिळाला तर मुलगा होणार.
गर्भधारणेच्या वेळी काय मिळणार हे मात्र कुणीच ठरवू शकत नाही. मुलगी झाली म्हणून बाईला दोष देणे हे तर पूर्णपणे चुकीचे आहे.
स्त्रोत : गर्भपात, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 4/22/2020
अनेक औषधांचा गर्भावर वाईट परिणाम हित असतो. म्हणून ...
स्त्रीच्या गर्भाशयातील फलन व भ्रूण किंवा गर्भ म्हट...
कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदा...
या विभागात गरोदरपण केंव्हा धोक्याचे असते. याची माह...