प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य (पोस्टपार्टम डिप्रेशन) म्हणजे प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे काही आठवडे किंवा महिने अतिशय उदास वाटणे किंवा संबंधीत मानसिक ताणतणावाची भावना वाटणे. प्रसूतीनंतरच्या ३ दिवसांमध्ये उदास किंवा असहाय्य वाटणे हे सामान्य आहे. स्त्रियांनी या भावनांविषयी जास्त चिंता करू नये कारण त्या साधारणपणे २ आठवड्यांमध्ये नाहीश्या होतात. प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य हा अधिक गंभीर स्वरूपाचा मूडमधील बदल असतो. तो अनेक आठवडे किंवा महिने कायम रहातो आणि दैनंदिन कामकाजांमध्ये ढवळाढवळ करतो. १० ते १५% स्त्रिया याने ग्रासलेल्या असतात. अगदी क्वचित याचेच अधिक गंभीर स्वरूप – प्रसूतीपश्चात मानसिक आजार (पोस्टपार्टम सायकोसिस) आकार घेते.
प्रसूतीनंतर येणा-या उदासपणाची किंवा मानसिक तणावाची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत मात्र खालील घटक याला कारणीभूत ठरू शकतात:
जर स्त्रियांना त्या गरोदर होण्यापूर्वी औदासिन्य आलेले असेल तर त्यांनी तसे डॉक्टर किंवा आयाला कळवावे. अशा गंभीर औदासिन्याचा परिणाम अनेकदा प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्यामधे होते. प्रसूतीदरम्यानचा तणाव सर्वसामान्य आहे आणि प्रसूतीपश्चात औदासिन्यास कारणीभूत ठरू शकणारा महत्त्वाचा घटक आहे.
लक्षणांमध्ये सतत रडणे, मूड वारंवार बदलणे आणि चिडचिडे होणे तसेच खूपच उदासीन वाटणे यांचा समावेश होऊ शकतो. जरा कमी प्रमाणात आढळणार्या लक्षणांमध्ये प्रचंड थकवा, एकाग्र होण्यात बाधा, झोपेच्या समस्या, कामेच्छा आणि इतर गोष्टींमधील रस उडून जाणे, अस्वस्थता, भूक बदलणे आणि अपुरेपणाची किंवा निराशावादी भावना यांचा समावेश होऊ शकतो. काम करताना स्त्रियांना अडचणी येतात. त्यांचा बाळामधील रस नाहीसा होऊ शकतो.
प्रसूतीपश्चात सायकोसिसमध्ये औदासिन्याच्या जोडीलाच आत्महत्येचे किंवा हिंस्त्रक विचार, भास किंवा विचित्र वागणे दिसू शकते. बाळाचे वडीलदेखील औदासिन्यास बळी पडू शकतात आणि वैवाहिक ताण वाढू शकतो. उपचार न केल्यास प्रसूतीपश्चात औदासिन्य अनेक महिने किंवा वर्षे टिकू शकते आणि स्त्रियांचे त्यांच्या बाळाशी बंध जुळत नाहीत. परिणामी मुलाला नंतर भावनिक, सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ३ किंवा ४ मधील एका स्त्रीला प्रसूतीपश्चात औदासिन्य आलेले असेल तर ते तिला पुन्हा येऊ शकते.
लवकर निदान आणि उपचार स्त्रिया आणि त्यांच्या बाळासाठी महत्त्वाचे आहे. प्रसूतीनंतर २ पेक्षा जास्त आठवडे औदासिन्य वाटत राहिल्यास किंवा नेहमीची कामे करण्यास त्रास होऊ लागल्यास किंवा मनात स्वतःला अथवा बाळाला इजा करण्याचे विचार येऊ लागल्यास स्त्रियांनी आपल्या डॉक्टरांना भेटावे. जर कुटुंबातील सदस्याला किंवा मित्रमैत्रिणींमध्ये अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी याविषयी स्त्रीशी बोलावे आणि तिला त्याविषयी डॉक्टरशी बोलण्यास प्रोत्साहित करावे.
डॉक्टर औदासिन्य ओळखण्यास सांगू शकतात. या लक्षणांमागे थायरॉईडसारखा एखादा आजार आहे का हे ठरविण्यासाठी ते काही रक्तचाचण्यादेखील करू शकतात.
मूल झाल्यानंतर येणार्या उदासीन भावनांवर मात करण्यासाठी स्त्रिया खालील उपाय करू शकतात::
जर स्त्रीला उदास वाटले तर तिला कुटुंबीयांचे आणि मित्रपरिवाराचे पाठबळ मिळाले तरी पुरेसे असते. मात्र जर औदासिन्य असल्याचे निदान झाले तर व्यावसायिक मदतसुद्धा घेणे गरजेचे असते. साधारणतः समुपदेशन आणि औदासिन्यविरोधी औषधे सुचविली जातात. प्रसूतीपश्चात सायकोसिस असणा-या स्त्रियांना इस्पितळात दाखल करणे गरजेचे असू शकते, विशेषतः देखरेख असलेल्या विभागामध्ये जेथे त्यांच्यासोबत बाळाला ठेवता येऊ शकते. त्यांना औदासिन्यविरोधी औषधांसोबतच सायकोटिकविरोधी औषधांचीही गरज भासू शकते.
स्तनपान देणा-या स्त्रियांनी यातील कोणतीही औषधे घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांना विचारून स्तनपान पुढे चालू ठेवता येईल का हे विचारावे. स्तनपान पुढे चालू ठेवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/13/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...