অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग

प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग प्रसुतीशी थेट (गर्भाशयामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये) किंवा अप्रत्यक्षपणे (मुत्राशय, स्वादुपिंड, स्तन किंवा फुफ्फुसामध्ये) संबंधित असू शकतात.

शिशुजन्मापश्चात ताप

ब-याचदा प्रसुतीनंतर लगेचच स्त्रीचे तापमान वाढते. प्रसुतीनंतरच्या पहिल्या १२ तासांदरम्यान १०१ अंश फॅ (३८.३ अंश से) किंवा त्यापेक्षा जास्त ताप संसर्गाची चिन्हे दर्शवू शकतो. प्रसुती होऊन गेल्यानंतर २४ तास उलटल्यानंतर आणि स्त्रीला किमान ६ तासांच्या अंतराने दोन वेळा १००.४ अंश फॅ (३८ अंश से) इतका ताप असतो तेव्हा साधारणतः प्रसुतीपश्चात जंतुसंसर्गाचे निदान होते. प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग क्वचितच होतो कारण डॉक्टर जंतुसंर्सगाला आंमत्रण देऊ शकणा-या कोणत्याही परिस्थितींना थांबविण्याचा किंवा त्यांवर उपचार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र जर जंतुसंसर्ग झाला तर तो गंभीर होऊ शकतो.

गर्भाशयाचे जंतुसंसर्ग

  • प्रसुतीनंतर लगेचच गर्भाशय आणि आजूबाजूच्या भागामध्ये विषाणूसंसर्ग होऊ शकतो.
  • सामान्यतः अशा जंतुसंसर्गामुळे खालच्या ओटीपोटामाध्ये दुखणे, ताप आणि अंगावरून दुर्गंधीयुक्त स्त्राव जाणे.
  • निदान साधारणपणे लक्षणे आणि शारीरिक तपासणी यांवर आधारीत असते.
  • संसर्गावर साधारणपणे प्रतिजैविकांचा इलाज केला जातो.

प्रसुतीपश्चात जंतुसंसर्गाची सुरुवात सामान्यतः गर्भाशयामध्ये होते. जर भ्रूण समाविष्ट असणा-या पडद्यामध्ये (अम्निओटिक सॅक) जंतुसंसर्ग झाल्यास असा संसर्ग होऊ शकतो आणि प्रसववेदनांच्या काळामध्ये तापास कारणीभूत ठरू शकतो. यामध्ये गर्भाशयाचे अस्तर (एण्डोमेट्रिटिस), गर्भाशयाचे स्नायू (मायोमेट्रिटिस) किंवा गर्भाशयाच्या आजूबाजूचा भाग (पॅरामेट्रिटिस) यांच्या संसर्गाचा समावेश होतो.

कारणे

निरोगी योनीमध्ये सामान्यपणे राहणारे विषाणू प्रसुतीनंतर संसर्गास कारण ठरू शकतात. ज्या परिस्थितींमुळे स्त्रीमध्ये जंतुसंसर्गाची शक्यता बळावते त्यांमध्ये खालील स्थितींचा समावेश होतो:

  • अनेमिया (रक्तक्षय)
  • बॅक्टेरिअल व्हॅजिनोसिस
  • सततच्या योनीतपासण्याs
  • भ्रुणाचे अंतर्गत पर्यवेक्षण (ज्यामध्ये पडद्यांना इजा पोहोचवावी लागते)
  • पडद्यांना इजा पोहोचविणे आणि प्रसुती यांदरम्यान खूप (१८ तासांपेक्षा जास्त) उशीर होणे
  • लांबलेल्या प्रसववेदना
  • सीझेरिअन प्रसुती
  • प्रसुतीनंतर गर्भाशयामध्ये नाळेचे तुकडे रहाणे
  • प्रसुतीनंतर प्रचंड रक्तस्त्राव होणे (प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव)
  • कोवळे वय
  • निम्न सामाजिकार्थिक गट
गर्भाशयातील जंतुसंसर्ग बळावण्याची शक्यता मुख्यतः प्रसुतीच्या प्रकारावर अवलंबून असते:
  • योनीतुन होणारी सामान्य प्रसुती: १ ते ३%
  • नियोजित केलेल्या आणि कळा सुरु होण्यापूर्वी केलेल्या सीझेरिअन प्रसुती: ५ ते १५%
  • नियोजित न केलेल्या आणि कळा सुरु होण्यापूर्वी न केलेल्या सीझेरिअन प्रसुती: १५ ते २०%
लक्षणे

लक्षणांमध्ये सामान्यपणे खालील ओटीपोटामध्ये किंवा नितंबामध्ये वेदना, ताप (सामान्यतः प्रसुतीनंतर १ ते ३ दिवसांमध्ये), फिकटपणा, थंडी भरणे, आजारी असल्याची किंवा बरे नसल्याची नेहमीची भावना आणि ब-याचदा डोकेदुखी आणि भुक नाहीशी होणे यांचा समावेश होतो. हृदयाचे ठोके ब-याचदा जलद असतात. गर्भाशय सुजलेले, नाजुक आणि मऊ असते. सामान्यपणे योनीमधून दुर्गंधीयुक्त स्त्राव होत असतो ज्याचे प्रमाण कमीअधिक होत असते. मात्र कधीकधी कमी दर्जाचा ताप हे एकच लक्षण आढळून येते.
जेव्हा गर्भाशयाभोवतालच्या ऊतींना संसर्ग होते तेव्हा त्या सुजतात ज्यामुळे प्रचंड असुविधा जाणवते. सामान्यतः स्त्रियांना खूप वेदना होतात आणि उच्च ताप येतो.

अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते मात्र सहसा होत नाही. यामध्ये खालील समाविष्ट असते:

  • ओटीपोटाचे अस्तर बनविणा-या पडद्यांना सूज (पेरिटोनोटिस)
  • नितंबाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (पेल्विक थ्रोम्बोफ्लेबिटिस)
  • रक्ताची गुठळी जी फुफ्फुसापर्यंत प्रवास करते आणि तेथील एखादी रक्तवाहिनी बंद करते (पल्मोनरी एम्बोलिझम)
  • संसर्गास कारणीभूत विषाणूंद्वारा तयार केल्या गेलेल्या विषारी पदार्थांची (विषाची) रक्तामध्ये उच्च पातळी ज्याची परिणिती सेप्सिस किंवा टॉक्सिक शॉकमध्ये होऊ शकते.

सेप्सिस आणि टॉक्सिक शॉकमध्ये रक्तदाब असामान्यपणे खालावतो आणि हृदयाचे ठोके खूप जलद होतात. याची परिणिती मुत्राशयास गंभीर हानी होण्यामध्ये होऊ शकते आणि मृत्यूदेखिल होऊ शकतो. हे खूपच दुर्मिळ आहे, खासकरुन जेव्हा प्रसुतीपश्चात तापाचे त्वरीत निदान आणि लवकर उपचार झालेले असतील.

निदान आणि उपचार

जंतुसंसर्गाचे निदान मुख्यतः शारीरिक तपासणीच्या निकालांवर आधारीत असते. काहीवेळा जंतुसंसर्गाचे निदान तेव्हा होते जेव्हा स्त्रीला उच्च ताप असतो आणि इतर कोणतेही कारण आढळून येत नाही तेव्हा यासंसर्गाचे निदान होते. सामान्यतः डॉक्टर लघवीचा नमुना घेतात आणि तो विषाणूंच्या तपासणीसाठी पाठवितात. कधीकधी रक्ताचा नमुना घेण्यात येतो. जर गर्भाशयाला जंतुसंसर्ग झालेला असेल तर स्त्रियांना शिरेतुन (सुई टोचून) प्रतिजैविके दिली जातात जोपर्यंत ४८ तास विनातापाचे जात नाहीत. त्यानंतर बहुतांश स्त्रियांना तोंडावाटे प्रतिजैविके घेण्याची गरज नसते.

वृक्क आणि मुत्राशयाचे संसर्ग

प्रसुतीपश्चात काहीवेळा वृक्कचा संसर्ग (सायस्टिटिस) उद्भवू शकतो आणि प्रसववेदनांदरम्यान आणि नंतर तयार होणा-या लघवीचे उत्सर्जन करण्यासाठी वृक्क-मध्ये कॅथेटर लावलेला असतो तेव्हा ही जोखीम अधिक असते. प्रसुतीनंतर वृक्क-मधून मुत्राशयापर्यंत पसणा-या विषाणूमुळे मुत्राशयाला संसर्ग (पायेलोनेफ्रिटिस) होतो. काहीवेळा वृक्क किंवा मुत्राशयामध्ये संसर्ग विकसित होतो कारण गर्भावस्थेदरम्यान वृक्कामध्ये असणा-या विषाणूंची प्रसुती होईपर्यंत कोणतीही लक्षणे दिसलेली नसतात.
वृक्क आणि ब-याचदा मुत्राशयाचे संसर्ग वेदनादायी असतात आणि त्यामध्ये सतत लघवीलादेखिल जावे लागते. मुत्राशय आणि वृक्काच्या काही संसर्गांमुळे ताप येतो. मुत्राशयाच्या संसर्गामुळे पाठीच्या खालच्या बाजूस किंवा कुशीमध्ये दुखू शकते, आजारी असल्याची किंवा असुविधेची नेहमीची भावना जाणवते आणि बद्धकोष्ठ होते.

निदान आणि उपचार

निदान लघवीच्या नमुन्याची तपासणी आणि विश्लेषण यांवर आधारीत असते. मुत्राशय किंवा काही वृक्क च्या संसर्गाबाबतीत नमुन्याला विषाणू ओळखण्यासाठी कल्चर्ड केले जाऊ शकते. साधारणतः स्त्रियांना मुत्राशयाच्या संसर्गासाठी शिरेवाटे प्रतिजैविके दिली जातात किंवा वृक्क संसर्गासाठी तोंडावाटे प्रतिजैविके दिली जातात. जर वृक्क-चा संसर्ग मुत्राशयापर्यंत पसरल्याचा पुरावा नसेल तर प्रतिजैविके केवळ काही दिवसांसाठीच दिली जातात. जर मुत्राशयाला संसर्ग झाल्याचा संशय असेल तर ती तोपर्यंत दिली जातात जोपर्यंत ४८ तास विनातापाचे जात नाहीत. ब-याचदा प्रतिजैविके तोंडावाटे ब-याच कालावधीसाठी दिली जातात. कल्चरचे निकाल उपलब्ध झाल्यावर उपस्थित विषाणूविरोधात अधिक प्रभावीपणे काम करणारी प्रतिजैविके दिली जाऊ शकतात.
भरपूर द्रव पदार्थ पिल्यामुळे मुत्राशयाचे काम व्यवस्थित चालण्यास आणि विषाणू मुत्रनलिकेतून बाहेर टाकले जाण्यास मदत होते.संसर्ग बरा झाला आहे हे पडताळण्यासाठी प्रसुतीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी लघवीचा दुसरा नमुना तपासला जातो.

स्तनाचा संसर्ग

प्रसुतीनंतर सामान्यतः पहिल्या ६ आठवड्यांदरम्यान आणि ब-याचदा स्तनपान देणा-या स्त्रियांमध्ये स्तनाचा संसर्ग (मास्टिटिस) होऊ शकतो. जर स्तनाग्राच्या किंवा त्याभोवतालच्या कारणीभूत ठरू शकतो. जर स्तनपानाच्यावेळी बाळाला योग्य स्थितीमध्ये धरले नाही तर तडे जाऊ शकतात आणि सूज येऊ शकते.
संसर्ग झालेले स्तन सामान्यतः लाल आणि सुजलेले दिसतात व गरम आणि नाजुक झालेले आढळून येतात. स्तनाचा केवळ काही भागच लाल आणि सुजलेला असू शकतो. स्त्रीला ताप असू शकतो. प्रसुतीनंतर १० दिवसांपेक्षा जास्त दिवसांनी आलेला ताप हा ब-याचदा स्तनाच्या संसर्गामुळे आलेला असतो.
क्वचितप्रसंगी स्तनाच्या संसर्गामुळे पस तयार होतो. त्या पसभोवती असणारा भाग सुजतो आणि पस स्तनाग्रावाटे बाहेर येऊ शकतो. प्रसुतीनंतर स्तनाचा संसर्ग विकसित झाल्यास स्त्रियांनी सामान्यतः स्तनपान देणे सुरू ठेवले पाहिजे.

उपचार

स्तनाच्या संसर्गांवर प्रतिजैविकांनी उपचार केले जातात. स्त्रियांना भरपूर द्रवपदार्थ पिण्यास सांगितले जाते. ज्या स्तनदा स्त्रियांना स्तनाचा संसर्ग असतो त्यांनी स्तनपान देणे सुरूच ठेवावे. स्तन योग्य पद्धतीने रिकामा करणे हा उपचारांचा एक भाग असतो आणि यामुळे स्तनामध्ये पस जमण्याची जोखीम कमी होते.
स्तनामध्ये झालेल्या पसवर प्रतिजैविकांनी उपचार केले जातात आणि बहुदा शस्त्रक्रिया करुउन तो काढून टाकला जातो. स्थानिक भूल वापरून हे करता येऊ शकते मात्र त्यासाठी शिरेतून दिल्या जाणा-या किंवा सामान्य भूलीचीही गरज भासू शकते.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate