क्यूबा
क्यूबा : रिपब्लिका द कूबा. कॅरिबियन समुद्रातील ग्रेटर अँटिलीस किंवा वेस्ट इंडीज द्वीपसमूहापैकी सर्वांत मोठे बेट व साम्यवादी देश. शेजारच्या लहानमोठ्या बेटांसह क्षेत्रफळ १,१०,९२२ चौ. किमी.; लोकसंख्या ८५,२३,२९२ (१९७०). याची पूर्वपश्चिम लांबी सु. १,२०० किमी., दक्षिणोत्तर रुंदी ४० ते २९० किमी. व किनारा सु. ३,५०० किमी. आहे.