इझ्राएल
इझ्राएल : (मेदिनात इझ्राएल). पश्चिम आशियातील नवोदित ज्यू-राष्ट्र. क्षेत्रफळ २०,७०० चौ. किमी.; लोकसंख्या २९,९९,००० (१९७१); २९०३०' उ. ते ३३०१५' उ. व ३४०१७' पू. ते ३५०४१' पू. याच्या सीमा उत्तरेस ७९ किमी. लेबाननशी, पूर्वेस ५३१ किमी. जॉर्डनशी व ७६ किमी. सिरियाशी, दक्षिणेस व पूर्वेस मिळून २०६ किमी.