इलिनॉय
इलिनॉय : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी एक राज्य. क्षेत्रफळ १,१८,१४० चौ किमी.; लोकसंख्या १,११,१३,९७६ (१९७०). ३६० ५८' उ. ते ४२० ३०' उ. आणि ८७० ३५' प. ते ९१० ४०' प. इलियॉनच्या दक्षिणेस केंटकी व मिसुरी, पश्चिमेस मिसुरी व आयोवा, उत्तरेस विस्कॉन्सिन, पूर्वेस मिशिगन सरोवर आणि इंडियाना व केंटकी ही राज्ये आहेत.