অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वच्छ, हिरवे व चमकदार गाव

स्वच्छ, हिरवे व चमकदार गाव

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या‍ दुर्गम भागातील कब्बीणगेरे गावात लक्षात येण्याइतकी दाट झाडी आहे. ह्या दूरवरच्या गावातील सहज न दिसून येणारी बाब म्हचणजे भारतात सर्वप्रथम ह्या गावाच्या ग्रामपंचायतीने विजेच्या जाळ्याला (ग्रिडला) वीज विकली.

कब्बीणगेरे ग्रामपंचायत, आपल्या स्वरचालित बायोमास उर्जा संयंत्रांमध्ये तयार झालेली वीज रू.2.85/kWh (USD0.06) च्या दराने बंगलोर वीजपुरवठा कंपनीस (बंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी) विकते. हा अग्रगण्य पुढाकार यूएनडीपीच्याा नेतृत्वाखालील द बायोमास एनर्जी ऑफ रूरल इंडिया प्रकल्पाचा एक परिणाम आहे. ह्याची अंमलबजावणी जागतिक पर्यावरण सुविधा (ग्लोबल  एन्व्हालयर्नमेंट फॅसिलिटी), भारत-कॅनडा पर्यावरण सुविधा (इंडिया कॅनडा एन्व्हायर्नमेंट फॅसिलिटी) आणि कर्नाटक सरकारच्या  ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागासह भागीदारीत करण्यात येत आहे.

250, 250 आणि 500 KW क्षमतेच्याय तीन लहान उर्जा संयंत्रांतून स्थानि‍करीत्याा गोळा केलेल्या बायोमासपासून विजेचे उत्पादन करण्यात येते. 2007 पासून सुमारे 400,000 kWh वीजनिर्मिती करण्यात आली आहे. हे प्रमाण 6000 ग्रामीण कुटुंबांच्यास वार्षिक वीजवापराइतके आहे आणि त्या भागामध्ये अधिक विश्वसनीय वीज पुरवठा सुनिश्चित करण्याीत मदत करीत आहेत.

विद्युत उत्पादनातील वाढीमुळे होणा-या फायद्यांच्या जोडीला हे जास्त पर्यावरण-मैत्रीपूर्ण आहे. बायोमासच्याआ माध्यमाने उत्पन्न होणार्‍या ह्या वि‍जेचे उत्पादन नीलगिरी व इतर प्रकारच्या स्थानिक झाडांपासून करण्यात येते आणि ह्याच कारणास्त्व वाढलेली मागणी पूर्ण करण्यावसाठी ह्या क्षेत्रात जास्त हिरवाईची वाढ करण्यात येत आहे.

“कधी-कधी आपल्या सभोवताली किती बदल झाले आहेत त्यावर विश्वाास ठेवणे कठीण होऊन बसते – आपल्या सभोवती कितीतरी जास्त हिरवाई आहे, वीज पुरवठा नियमित आहे आणि स्वयंपाक करण्यासाठी आपल्याकडे स्वच्छ इंधन आहे,’ कब्बीणगेरे ग्रामसमितीचे अध्यक्ष सिध्दधगंगम्मार म्हणतात.

25 वर्षीय रंगम्मामच्या दृष्टीने घडलेल्याई बदलाचा अर्थ एवढाच की तिला तिच्याच पतीसह जास्त वेळ राहता येते. ‘माझे पती आता फार आनंदी आहेत कारण त्यांहना रोज लाकडे वेचायला जावे लागत नाही. त्यांंना आता थोडा मोकळा वेळ मिळतो आणि त्यांच्या हाती थोडेसे पैसेदेखील शिल्लक राहतात,’ सस्मित मुद्रेची रंगम्माा ह्याच्यात जोडीला म्हणते: ‘मला माझ्या कुटुंबासाठी स्वयंपाक करायला आवडते आणि आता मला धुराने गुदमरल्यायसारखे होत नाही.’

पर्यावरणीय लाभाव्यतिरिक्त, प्रकल्पापासून होणारी आर्थिक बचत देखील उल्लेखनीय आहे. एक्कावन्न समूह बायोगॅस किंवा गोबर (शेण) गॅस संयंत्रांच्याु मदतीने, जी प्रकल्पाचा एक भाग म्हणून स्थापित करण्यात आलेली आहेत, संचालन मूल्यात कोणतीही वाढ न होता 175 कुटुंबांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करण्यात आला आहे, असे निरीक्षण अहवालानुसार आढळले आहे.

पांच कुटुंबासाठी एक अशा प्रमाणात, गावांतील १३० बोरवेलचा उपयोग, निर्माण करण्यात येणार्‍या विजेमुळे गावांतील शेतीसाठी पाणीपुरवठ्याची गरज भागविली जाण्याची निश्चिती होते. ह्यामुळे कब्बीणगेरे गावांतील कुटुंबांच्या सरासरी घरगुती मिळकतीत 20 टक्के वाढ झाली आहे असे एक प्रकल्प अधिकारी म्हणाले. त्यांनी पुढे म्ह्टले की: "विद्युत संयंत्रांमध्ये बंगलुरू येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सने नियमित प्रशिक्षण दिले आहे अशा स्थाानिक लोकांची नियुक्ति केल्यामुळे, कुशल मजुरांच्या  पिढीचा विकास झाला आहे आणि रोजगाराच्‍या संधी देखील वाढल्या आहेत."

ह्याखेरीज, बायोगॅस संयंत्रांना ८१ स्व-मदत गटांच्या द्वारे स्थापित करण्यात आलेल्यां नर्सरींपासून जैविक कचरा प्राप्त होतो आणि गरिबीच्या सीमेवर असलेल्या स्त्रियांना ह्याद्वारे मिळकत प्राप्त होते.

गावाची विजेची गरज नवीकरणीय उर्जेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी तसेच स्वयंपाक व जलसिंचन (शेती पाणी पुरवठा) पध्द‍तींमध्ये सुधार घडवून आणल्यामुळे संभाव्य टिकाऊ पर्यावरणीय विकास सुधारणेत प्रभावी कार्यप्रदर्शन दिसून आले.

स्रोत: www.undp.org

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate