1) ज्या जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण 35 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा जमिनीच्या निचऱ्यासाठी कमी खर्चिक मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
2) मोल निचरा पद्धतीमध्ये मोल नांगराद्वारा जमिनीपासून 40 ते 75 सें. मी. खोलीवर पाइपसारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जाते. यालाच मोल असे म्हणतात. हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावेत. जमिनीत हे मोल पाडत असताना जमिनीच्या पृष्ठभागापासून मोलपर्यंत जमिनीचा भाग हा मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारा कापला जाऊन एक पोकळ फट तयार होते.
3) मोल तयार झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी मशागत करावी- जेणेकरून मोल वाळण्यास अवधी मिळून ते टणक बनतील. पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे मोल नांगराद्वारा जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते.
4) जमिनीमध्ये मुरलेले जास्तीचे पाणीसुद्धा मोलमध्ये जमा होऊन जमिनीच्या उताराच्या दिशेने जमिनीबाहेर जाते. अशा प्रकारे जमिनीतील पाण्याचा निचरा होतो.
5) या पद्धतीत साध्या नांगरटीप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्टरला जोडून वापरले जाते, तसेच प्रत्येकी चार मीटर अंतरावर हे नांगर वापरायचे असल्याने नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो. कमी खर्चिक मोल निचरा पद्धतीचा वापर करून क्षारपड- पाणथळ जमिनीमध्ये पिकांचे उत्पादन वाढविता येईल.
1) जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण 35 टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
2) जमीन नैसर्गिक उताराची असावी.
3) मोल करताना 40 ते 75 सें. मी. खोलीवर मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण 20 ते 25 टक्के असावे. या खोलीवरील माती कोरडी असेल, तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात, तर ओलावा जास्त असेल तर नांगर ओढण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर जमिनीमध्ये रुतू शकतो.
4) मोलमधून निचरा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ 75 ते 90 सें. मी. खोलीचा उघडा चर असावा.
5) दोन मोलमध्ये सर्वसाधारणपणे चार मीटर अंतर ठेवावे. मोलाची खोली 40 ते 75 सें. मी. ठेवावी. मोलाची लांबी सामान्यतः 20 ते 100 मीटर ठेवावी.
संपर्क - 0233- 2437275
कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मी रब्बी हंगामासाठी कांद्याची गादीवाफ्यावरच रोपवाट...
कारले लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा...
धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील प्रकाश सीताराम पाटील...
कोंबड्यांमध्ये आढळणारे बाह्य परोपजीवी म्हणजेच उवा,...