१) या विभागात भात, नागली, वरई ही मुख्य पिके आहेत. काही शेतकरी ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी भात रोपवाटिका पेरणी १५ मेपासून सुरवात करतात. त्याचबरोबर पाण्याची सोय नसणारे शेतकरी पावसापूर्वी सर्वसाधारणपणे १ जूनच्या दरम्यान धूळपेरणी करून रोपवाटिका तयार करतात. ज्यांनी ओलिताखाली रोपवाटिका केली आहे, अशा शेतकऱ्यांना भाताच्या रोपांची पावसाअभावी पुनर्लागवड करता आली नाही, त्यामुळे भात रोपाचे वय वाढत चाललेले आहे. ज्यांनी धूळपेरणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या रोपवाटिकेत पावसाअभावी बियाण्यांची उगवण झालेली नाही. अशा परिस्थितीत खालीलप्रमाणे पीक नियोजन करावे.
१) ओलिताखाली तयार केलेल्या रोपवाटिकेतील रोपाचे वय ३ ते ४ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास पुनर्लागवडीच्या वेळी एका चुडात ३ ते ४ रोपे लावावीत.
२) दोन चुडातील अंतर नेहमीपेक्षा कमी ठेवावे - पाण्याची सोय असल्यास थोड्या खोलगट भागात चिखलणी करून लागवडयोग्य सर्व रोपांची तात्पुरत्या स्वरूपात लावणी करावी. पुन्हा पावसानंतर चिखलणी करून त्या क्षेत्रात त्यांची पुनर्लागवड करावी. अशा प्रकारे रोपांची दोनदा पुनर्लागवड करावी.
३) पुनर्लागवडीसाठी चारसूत्री तंत्रांचा वापर करावा - ज्या ठिकाणी धूळपेरणी केलेली आहे व त्यानंतर पाऊस पडलेला नाही, पेरणी करून जास्त दिवस झालेले असतील, अशा रोपवाटिकेतील बियाण्यांच्या उगवणीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पुनर्लागवडीसाठी योग्य रोपांची संख्या मिळणार नाही. अशा परिस्थितीत नव्याने सामुदायिक रोपवाटिका करण्यात यावी.
४) पावसाला ३० दिवसांपेक्षा उशिरा सुरवात झाल्यास पेरणी किवा टोकण पद्धतीचा अवलंब करावा.
५) नागली (नाचणी) लागवड - डोंगरमाथ्यावरील उथळ जमिनीतील भात खाचरामध्ये भात रोपाची पुनर्लागवड करू नये. अशा ठिकाणी १५ जुलैपर्यंत नागली लागवड करावी. ३० दिवसांपेक्षा पावसाला उशिरा सुरवात झाल्यास (१५ जुलैनंतर) नाचणीऐवजी कारळे, तीळ ही पूर्ण पिके म्हणून घ्यावीत.
१) या विभागात ओलिताची सोय असलेली प्रामुख्याने बागायती पिके व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. खरीप हंगामात पावसावर प्रामुख्याने बाजरी, भुईमूग, सोयाबीन यासारखी पिके घेतली जातात.
२) जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस झाल्यास मूग, उडीद, खरीप ज्वारी ही पिके वगळून बाजरी, भुईमूग, सोयाबीन या पिकांची पेरणी करावी.
३) सलग पेरणीपेक्षा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी भुईमूग + सोयाबीन (४ - १), सोयाबीन + तूर (३ - १), बाजरी + तूर( २ - १) अशी आंतरपीक पद्धती असावी. पेरणीसाठी कमी कालावीमध्ये येणाऱ्या जातीची निवड करावी.
४) पिकाची पेरणी उतारास आडवी करावी. मूलस्थानी जलसंधारणाचे तंत्र अवलंबावे. पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी.
५) पेरणीच्या वेळी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी. पिकाची आंतरमशागत वेळेत करावी. चाऱ्यासाठीच्या पिकाची निवड करावी.
१) या विभागांत पावसास बऱ्याच वेळा जुलै-ऑगस्टमध्ये सुरवात होते. या विभागात खरिपाऐवजी रब्बी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीलायक पाऊस पडल्यास मूग, उडीद, खरीप ज्वारी ही पिके घेऊ नयेत. त्याऐवजी बाजरी, तूर, सूर्यफूल, सोयाबीन यासारख्या पिकाची पेरणी करावी. शक्यतो बाजरी + तूर (२ः१) सूर्यफूल + तूर (२ः१) सोयाबीन + तूर (३ः१) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. कमी कालावधीचे वाण तसेच संकरित वाणाची निवड करावी.
२) चाऱ्यासाठी पिकाची निवड करावी.
३) पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी. शिफारशीनुसार खताचा वापर करावा. पेरणी उतारास आडवी करावी. मूलस्थानी जलसंधारणाचा अवलंब करावा.
४) बियाण्यांची उपलब्धता विचारात घेता शेतकऱ्यांनी स्वतःकडील उपलब्ध बियाणे शिफारशीनुसार पेरावे. निर्धारित उगवणशक्ती कमी असल्यास त्या प्रमाणात बियाण्यांच्या प्रमाणात वाढ करावी.
५) अवर्षण प्रवण विभागात पावसास विलंब झाल्यास ४५ सेंमीपेक्षा खोल जमिनीची पूर्व मशागत वेळीच करून मूलस्थानी जलसंधारणासाठी अशा जमिनीत खरिपाचे पीक न घेता सरळ रब्बी हंगामाचे पीक घेण्यात यावे, १० मीटर बाय १० मीटर किंवा १२ मीटर बाय १० मीटर अंतरावर वाफे करून ठेवावेत. त्यामुळे पाऊस उशिरा झाला तरी मूलस्थानी जलसंधारण होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग कोणत्या वे...
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खर...
ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्व...