उसामध्ये आंतरपीक घेतल्याने फायदा होतो. प्रामुख्याने आंतरपिकांमुळे एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. सुरू उसामध्ये भुईमूग, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
सुरू उसाचा कालावधी 12 ते 13 महिन्यांचा असतो.
लागणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा आहे. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्याचा कालावधी लागतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते.
उसामध्ये आंतरपीक घेतल्याने फायदा होतो. प्रामुख्याने आंतरपिकांमुळे एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. सुरू उसामध्ये भुईमूग, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
सुरू उसातील आंतरपिके -
सुरू उसामध्ये आंतरपिकाची निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाच्या जमीन क्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकांच्या बियाण्याचे प्रमाण ठरविणे गरजेचे आहे.
ऊस बेणेप्रक्रिया
कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण, तसेच काणी रोगाच्या बंदोबस्तासाठी प्रति हेक्टरी 300 मि.लि. मॅलेथिऑन + 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम 100 लिटर पाण्यात मिसळून बेणे दहा मिनिटे बुडवावे. रासायनिक बेणे प्रक्रियेनंतर अर्ध्या तासाने प्रति हेक्टरी दहा किलो ऍसेटोबॅक्टर व 1.25 किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे टिपरी अर्धा तास बुडवावी. त्यानंतर लागवड करावी.
कांदा ः तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे
भुईमूग ः 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक प्रति दहा किलो बियाणे
ऊस आणि आंतरपिकांसाठी तणनाशकाचा वापर -
सुरू उसामध्ये आंतरपिकाचा समावेश केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही; परंतु आवश्यकतेनुसार खुरपणी करावी. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निवडक रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. ऊस आणि कांदा या आंतरपीक पद्धतीसाठी ऑक्झिफ्लोरफेन हे तणनाशक 0.6 ते एक लिटर प्रति 700 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. तणनाशकाची फवारणी कांदा लावणीनंतर तीन ते चार दिवसांनी करावी. तणनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
खत व्यवस्थापन (कि. / हे.) (को 86032 व्यतिरिक्त इतर सर्व ऊस जाती)
को 86032 या जातीची उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे, तसेच ही जात रासायनिक खतांच्या जादा खतमात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे या जातीसाठी सुरू उसासाठी प्रति हेक्टरी 300 किलो नत्र, 140 किलो स्फुरद व 140 किलो पालाश नेहमीच्या पद्धतीने वापरावे. जिवाणू खताच्या बेणेप्रक्रियेमुळे 50 टक्के नत्र व 25 टक्के स्फुरद या अन्नद्रव्यांची बचत होते. म्हणून वरील शिफारशीत नत्र व स्फुरद खताची मात्रा हेक्टरी अनुक्रमे 50 व 25 टक्के कमी करावी.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार एकरी दहा किलो फेरस सल्फेट व आठ किलो झिंक सल्फेट 50 ते 100 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. स्फुरदयुक्त खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून द्यावी, त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची अतिरिक्त मात्रा द्यावी लागणार नाही. सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला नसल्यास एकरी 25 किलो गंधकाची मात्रा द्यावी.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्व...
नगर जिल्ह्यातील शेरी चिखलठाण येथील सूर्यभान काकडे ...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
जळगाव जिल्ह्यातील वेले (ता. चोपडा) येथील विनोद पाट...