অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जीवन सत्त्वे

जीवन सत्त्वे

आपल्या शरीराला चार प्रकारचे जीवन सत्त्वे आवश्यक आहे. उदा. अ, ब, क, ड

 

जीवनसत्त्व “अ” चे कार्य –

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. ज्या बाळामध्ये जीवनसत्त्व ‘अ’ ची कमतरता आहे, त्यांनी पुढील गोष्टींचा आहारात समावेश करावा –
भोपळा, गाजर, पिकलेला आंबा, हिरव्या भाज्या जसे कि पालक, मेथी, हरबरा, दुध, मका, मोड आलेले कडधान्य इ. गोष्टींचे सेवन करावे.

जीवनसत्त्व अ ची कमतरता

जीवनसत्त्व अ च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा आजार होतो.

जीवनसत्त्व “ब”

जीभ व तोंडाच्या आतील त्वचा ओली व नरम ठेवणे.
* रक्तातील आवश्यक घटक निर्माण करणे.

जीवनसत्त्व ब ची कमतरता

बेराबेरी हा आजार जीवनसत्त्व ब च्या कमतरतेमुळे होतो.

बेराबेरी ची चिन्हे/ लक्षणे-

  • तोंडात फोड येणे.
  • रक्त फिके पडणे.
  • ओठ, कण, नाकाचे कोपरे कापणे
  • पाय दुखणे व पायाची आग होणे
  • ज्या भागावर सुर्यप्रकाश पडेल तो भाग फाटणे
  • घ्यावयाची काळजी –

  • हिरव्या भाज्यात जीवनसत्त्व ‘ब’ खुप प्रमाणात असते. म्हणून दररोजच्या जेवणात यांचा समावेश असावा.
  • हिरव्या भाज्या
  • बटाटा, सफरचंद, चिकू इ. फळांच्या साली तसेच डाळींचे टरफल, हातसडीच्या तांदूळाच्या वरील भागावर जीवनसत्त्व ब जास्त असते. कुठलीही भाजी आणि अन्नातही ते जास्त प्रमाणात असते.
  • तांदुळ, डाळींना घासुन घासून धुवू नये किंवा त्यांचे पाणीही काढू नये. साली सहित डाळी उपयोगात आणाव्या.
  • जीवनसत्त्व "क" चे कार्य –

    कुठलीही जखम लवकरात लवकर भरण्यास मदत होते.
    * जेवणातील जास्तीत जास्त लोह शोषून घेते.
    * रक्तातील केश वाहिन्यांची कार्यक्षमता वाढवितो.

    जीवनसत्त्व क ची कमतरता –

  • हिरड्या सुजणे
  • हिरड्यांतून रक्त येणे
  • संधिवाताचा त्रास होणेदात पडणे ( कमी वयात)
  • केस गळणे.
  • घ्यावयाची काळजी

    दररोजच्या जेवणात पुढील गोष्टींचा समावेश करणे

  • आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच, मोच्द आलेल्या धान्यात विटामिन सी जास्त प्रमाणत असते.
  • भिजवलेले पदार्थ उदा. ढोकळा, इडली इ.मध्ये विटामिन सी जास्त असते.
  • जीवनसत्त्व "ड" व कॅल्शियमचे कार्य

    • हाडे मजबूत करणे
    • हाडे व दाताचा विकास करून मजबूत करणे
    • जखम झाल्यानंतर रक्त लवकर थांबणे (जमा होणे)

    जीवनसत्त्व "ड" व कॅल्शियमची कमी

    • छोटया मुलांचे हात पाय ढिले पडणे किंवा वाकणे
    • गरोदर मातेला प्रसूतीची बाधा आणणे
    • हात पायाच्या सांध्यामध्ये सुज होणे.
    • बालकाच्या छातीची हाडे दिसणे
    • मुलांच्या हाडात गाठी होणे
    • मुडदूस हा ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो.

    घ्यावयाची काळजी

      सूर्यप्रकाशामुळे ‘ड’ जीवनसत्त्व जास्त प्रमाणत मिळते. छोटया बालकांना सकाळच्या कोवळ्या उन्हात ठेवणे. तेलयुक्त आहर घेतल्यास ‘ड’ जीवनसत्त्व मिळू शकते. उदा. शेंगदाणा तेल, जवस तेल, सरकी तेल इ. केळ, दुध, ताक, दही यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
    स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

    अंतिम सुधारित : 9/1/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate