অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गणित व सांख्यिकी

गणित व सांख्यिकी

 • अंक
 • संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी.

 • अंकगणित
 • अंकगणितात प्रामुख्याने धन पूर्णाकांच्या (म्हणजे १, २, ३, ४... या नेहमीच्या स्वाभाविक संख्यांच्या) गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.

 • अंतर्वेशन व बहिर्वेशन
 • जर क्ष आणि य या दोन चलांमधील (बदलत्या राशींमधील) य = फ (क्ष) हा फलनसंबंध (परस्पर संबंधदर्शक समीकरण) माहीत असेल तर क्ष च्या फलन-प्रांतातील कोणत्याही मूल्यासाठी य चे मूल्य काढता येते.

 • अनुक्रमात्मक विश्लेषण (सांख्यिकीय)
 • उपलब्ध सांख्यिकीय निरीक्षणांचे विशिष्ट पद्धतीने एकामागून एक म्हणजे अनुक्रमाने विश्लेषण करून योग्य ते अनुमान काढण्याच्या तंत्राला अनुक्रमात्मक विश्लेषण म्हणतात

 • अप्राचलात्मक पद्धति
 • अप्राचलात्मक पद्धति ची माहिती

 • अर्थमिती
 • सिद्धांत-स्वरूपात मांडलेल्या अर्थशास्त्रीय संकल्पनांचे सांख्यिकीय अवलोकन

 • अवकलन व समाकलन
 • कलन या गणितशाखेचे अवकलन व समाकलन असे दोन विभाग मानतात.

 • अविभाज्य संख्या
 • ज्या संख्येला १ किंवा ती स्वतः यांखेरीज दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, तिला 'अविभाज्य संख्या' म्हणतात.

 • आर्थर केली
 • इंग्लिश गणितज्ञ. गणितीय विश्लेषण व बीजगणित या विषयांत महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म रिचमंड, सरे येथे झाला.

 • आर्थिक सांख्यिकी
 • एखाद्या देशाच्या किंवा राज्याच्या अर्थव्यवस्थेसंबंधी दिलेली सर्वसाधारण अशी आकडेवार माहिती

 • आलेख
 • दोन अथवा अधिक संचांमधील (माणसे, वस्तू, त्यांचे विविध गुणधर्म इत्यादींच्या समूहांमधील) परस्परसंबंधांचे भूमितीय चित्रण म्हणजे आलेख होय.

 • आव्यूहसिद्धांत
 • आव्यूह म्हणजे काही [सत् किंवा सदसत्, संख्या] संख्यांची एका विशिष्ट तऱ्हेने केलेली आयताकार मांडणी. ज्या संख्यांनी आव्यूह तयार होतो त्यांना त्या आव्यूहाचे घटक म्हणतात.

 • इ(e)
 • गणितातील एक महत्त्वाची संख्या. ऑयलर (१७०७–८३) या गणितज्ञांनी e ही संख्या शोधून काढली.

 • एकरूपता
 • भूमितीत, दोन एकतली (एका पातळीत असलेल्या) आकृत्यांमध्ये (मग त्या दोन्ही एकाच प्रतलात म्हणजे पातळीत असोत वा भिन्न प्रतलांत असोत) जर बिंदूस बिंदू असा एकास-एक संवाद असून

 • ऑग्युस्तीन ल्वी कोशी
 • फ्रेंच गणितज्ञ. अनुप्रयुक्त (व्यावहारिक) गणितात अतिशय उपयुक्त ठरलेल्या सदसत् चलांच्या फलन सिद्धांताचे संस्थापक [ फलन].

 • कलन
 • कलन याचा मूळ अर्थ जाणणे, समजावून घेणे, आकलन करणे असा आहे. कलन याचा इंग्रजी प्रतिशब्द Calculus हा Calcule (अर्थ : लहान खडे अथवा गोटे) या लॅटिन शब्दावरून आला आहे.

 • कालश्रेढी विश्लेषण
 • स्थूलमानाने एखद्या चलाच्या ( बदलत्या राशीच्या) मूल्यांचा कालक्रमानुसार अनुक्रम लावला, तर त्याला कालश्रेढी म्हणतात.

 • कृषि सांख्यिकी
 • कृषिविषयक निरनिराळ्या बाबींसंबंधी पद्धतशीरपणे गोळा व संग्रहित केलेली आकडेवारी म्हणजे कृषी सांख्यिकी होय

 • कोन
 • एखाद्या रेषेने तीवरील एका बिंदूभोवती, एकाच प्रतलात (पातळीत) केलेल्या परिभ्रमणाचे मोजमाप म्हणजे कोन होय.

 • गणिताचा तात्त्विक पाया
 • गणिताच्या तात्त्विक पायासंबंधीच्या विवेचनांत गणितांतील मूलभूत संकल्पना व त्यांच्या संबंधीची प्रचलित गृहीतत्त्वे व स्वयंसिद्धके (स्वतः सिद्ध असलेली व सामान्यतः ग्राह्य मानण्यात येणारी तत्त्वे) यांसंबंधी तात्त्विक आणि ज्ञानविषयक चर्चा यांचा अंतर्भाव होतो.

 • गणितीय विगमन
 • विवेचन पद्धती निर्दोष असेल, तर गणितीय विगमनने काढलेला निष्कर्ष संपूर्णत: बरोबर असतो.

 • गुणवत्ता नियंत्रण
 • ग्राहकाच्या विशिष्ट गरजांनुसार उत्पादकाला आपल्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मालाची गुणवत्ता विशिष्ट पातळीवर नियंत्रित ठेवणे आवश्यक असते.

 • गोटी चौकट
 • गोटीचौकटीचा उपयोग पूर्णांक व त्यांची बेरीज या प्राथमिक गणितकृत्याविषयीची कल्पना सुलभपणे समजावून देण्याकरिता होतो.

 • गोलीय हरात्मकांचे गुणधर्म
 • दिलेल्या कोणत्याही म घाताची, परस्परांशी एकघाती संबंध नसलेली, अशी (२ म+१) पृष्ठ गोलीय हरात्मके अस्तित्वात असतात.

 • गोलीय हरात्मके
 • गोलीय हरात्मके ही गणितशास्त्रातील एका विशिष्ट प्रकारची फलने (गणितीय संबंध) होत.

 • जीवसांख्यिकी
 • (बायोमेट्री). विज्ञानाच्या ज्या शाखेत जीवविज्ञान आणि गणितीय सांख्यिकी (संख्याशास्त्र) ह्या दोन प्रमुख शास्त्रांचा जिवंत प्राणिमात्रासंबंधीच्या गोष्टींचे संशोधन करण्यासाठी उपयोग केला जातो

 • दामोदर धर्मानंद कोसंबी
 • एक प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित व गणितज्ञ. जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्माचे अभ्यासक प्रा. धर्मानंद कोसंबी हे त्यांचे वडील.

 • नियमालेखन
 • एखाद्या समीकरणाने दोन वा अधिक चलांसंबंधी जो गणितीय नियम व्यक्त होतो

 • निर्णय पद्धती
 • सांख्यिकीच्या (संख्याशास्त्राच्या) या शाखेची स्थापना आणि सुरुवातीचा बराचसा अभ्यास अब्राहम वॉल्ड (१९०२–५०) या अमेरिकन गणितीय सांख्यिकांनी केला

 • निर्देशांक
 • वस्तूंच्या वा वस्तु-समूहाच्या बाबतीत दोन स्थितींत किंवा दोन कालखंडांत त्यांच्या बाजारभावांत किंवा अन्य मापनीय चलांत (बदलणाऱ्या राशींत) होणाऱ्या बदलांची सर्वसाधारण पातळी अजमाविण्याचे गमक

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate