ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास
रायगड किल्ला पर्यटन विकास माहिती.
माहुली किल्ला परिसरातील वनपर्यटन
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात माहुली किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे ,तेथील प्राण्यांची माहिती , धबधबे , तसेच तेथील पर्यटकांच्या सोयी सुविधेविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
मुल्हेर किल्ला
महाराष्ट्रातील शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. तो नासिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात (सटाणा) मुल्हेर शहराच्या दक्षिणेस ३·२१ किमी. वर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची १,३१७ मी. आहे.
रायगड किल्ला
रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते.
हरिश्चंद्रगड किल्ला
हरिश्चंद्रगड किल्ला – ४००० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
जिंजी (तामिळनाडू)
जिंजी हा भारतातील सर्वात सुंदर किल्यांपैकी एक असलेला किल्ला.
प्रतापगड किल्ला
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०८१ मी. असून दोन्ही बाजूस २०० ते २५० मी खोल दरी आहे.
मांडवीचा किल्ला
मांडवीचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. तो नेमक्या कोणत्या वर्षी बांधला याची माहिती नाही. तथापि उत्तर कोकणचा प्रदेश ताब्यात आल्यानंतर व शिवकालापूर्वी हा किल्ला बांधण्यात आला असावा.
शिवकालीन इंदुरीचा किल्ला (गढी)
इंदुरीचा किल्ला हा फार दुर्मिळ असा किल्ला आहे. या किल्ल्याची शिल्प वास्तू ही प्राचीन कलेवर आकारली आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते.
बेलापूरचा किल्ला
बेलापूर रेल्वे स्टेशनला उतरुन पाम बीच रोडकडे वाटचाल करत असताना डावीकडे एक रस्ता बंदराचा किंवा खाडीच्या दिशेने जातो. हा रस्ता व वाशीकडे जाणारा रस्ता यांच्यामध्ये जो कोनाकृती भाग तयार होतो त्या क्षेत्रात असलेल्या टेकडीवर हा किल्ला वसला आहे.
शिरगावचा किल्ला
पालघर जिल्ह्यातील शिरगाव या गावी असलेला किल्ला हा या गावच्या नावावरुन म्हणजेच शिरगावचा किल्ला म्हणून ओळखला जातो. पश्चिम मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गावर पालघर स्टेशन आहे.
बाणूरगड किल्ला
शिवकालीन इतिहसाचा साक्षीदार म्हणून गणल्या गेलेल्या शिवछ्त्रपतीचे सच्चे सेवक बहिजी नाईक यांची समाधी आहे.
मिरज संस्थान
मिरज संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील दक्षिण महाराष्ट्रातील एक संस्थान. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७६२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला.
फोंडे
गोवे केंद्रशासित प्रदेशात असलेला एक भुईकोट किल्ला . बेळगाव – पणजी मार्गावर पणजीपासून आग्नेयीस सु . २५ किमी . अंतरावर वसला आहे .
English to Hindi Transliterate