खाजकुइली
खाजकुइली : (कवच, खाजकुइरी; हिं. गोंचा; गु. किंवच; क. कडवरे, हसगुणी; सं. तीक्ष्णा, वनारी, आत्मगुप्ता; इं. कौहेज, कोविच, हॉर्सआय बीन; लॅ. म्युक्यूना प्रूरिएन्स; कुललेग्युमिनोजी). जंगलात व शेताकडेने कुंपणावर पसरणारी ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल आहे.