वैद्यकीय प्रतिमादर्शन
वैद्यकीय प्रतिमादर्शन : (मेडिकल इमेजिंग). ही वैद्यकाची विशेषीकृत शाखा आहे. शरीरातील अवयव व इतर अंतर्गत संरचना यांच्या प्रतिमा मिळविण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी या शाखेत क्ष-किरण, गॅमा किरण, उच्च कंप्रतेचे ध्वनितरंग अथवा चुंबकीय क्षेत्रे यांचा उपयोग करतात.