तांत्रिकदृष्ट्या कोणताही खाद्यपदार्थ थोडा अणुकिरणोत्सरी असतोच सर्व अन्न पदार्थात कार्बन हे मूलद्रव्य असतेच.
माणूस सोडून दुसरा कोणताच प्राणी अन्न शिजवून खात नाही.
स्वसामर्थ्यावर पूर्णपणे न वाढता दुसऱ्या आधारभूत वनस्पतीवर वाढणाऱ्या पण आपले अन्न-पाणी आश्रय-वनस्पतीच्या शरीरातून न घेता किंवा मुळांच्या द्वारे जमिनीतून न शोषता स्वतंत्रपणे ते मिळवून जीवनक्रम चालविणाऱ्या वनस्पतीस हे नाव दिले जाते.
यंत्र म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्या प्रकारच्या ऊर्जेत रुपांतर करणारे साधन, खास करून रुपांतरीत ऊर्जेद्वारे यांत्रिक कार्य करून देणारे साधन.
अनेक सजीवांत नैसर्गिक रीत्या तयार होणारी नायट्रोजनयुक्त व रासायनिक दृष्ट्या आम्लारीधर्मी संयुगे. निसर्गत: अल्कलॉइडे प्रामुख्याने वनस्पतींमध्ये आढळतात.
अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सु. ९,००० जाती आहेत. हे प्राणी बहुपेशीय आणि द्विस्तरी असतात. त्यांचे शरीर पेशींच्या बाह्यस्तर आणि अंत:स्तर यांनी बनलेले असते. शरीरामध्ये जठरवाहिनीगुहा अथवा आंतरगुहा अथवा आंतरदेहगुहा असते. ही गुहा म्हणजे पोकळी.
आपण किती जिवांना पोसतो?या प्रश्नाचं उत्तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे.
व्यक्तीप्रमाणे, ऋतुमानाप्रमाणे, तब्येतीप्रमाणे, आवडीनिवडीप्रमाणे यात बदल होऊ शकतो.
परिभ्रमण किंवा दोलन करणाऱ्या वस्तू स्थिर दिसाव्यात व त्यावरून त्यांच्या कंप्रता (दर सेंकदास होणारी परिभ्रमणे वा दोलन संख्या) मोजता याव्यात यासाठी वापरण्यात येणारे आवृत्तिदर्शक हे एक साधन आहे.
प्रत्येक गाडीतील बैठकीची चौकट व चाके यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा असतो. गाडीची चाके आसावर आधारलेली असतात.
सार्वजनिक आरोग्य व इतर सर्व अविनाशक उद्योगांच्या उत्कर्षाकरिता अणुऊर्जेसंबंधी संशोधन करून अणुऊर्जेचा वापर करण्यास उत्तेजन देणारी व सर्व प्रकारची मदत करणारी आंतरराष्ट्रीय संस्था.
निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये चालू असलेले शास्त्रीय विषयांतील सैद्धांतिक व अनुप्रयुक्त (व्यवहारात उपयोगी पडणारे) संशोधन एकमेकांच्या सहकार्याने घडवून आणण्यास मदत करणारी आंतरराष्ट्रीय संस्था.
घनरूप धातवीय मूलद्रव्य. चिन्ह In.; अणुभार ११४·७६; अणुक्रमांक ४९; आवर्त सारणीतील (मुलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील) गट ३.
पाहणाऱ्याच्या पाठीशी सूर्य क्षितिजापासून फार उंच नसेल, तर सकाळी पश्चिमेस व संध्याकाळी पूर्वेस पाऊस पडत असताना, आकाशात जे विविधरंगी वर्तुळखंड दिसते त्यास इंद्रधनुष्य म्हणतात.
इंधनामधील रासायनिक ऊर्जेचे सरळ विद्युत् ऊर्जेत अखंडपणे रूपांतर करणारे साधन.
सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या लॅसर्टीलिया गणातील इग्वानिडी कुलातला हा सरड्यासारखा, पण त्याच्यापेक्षा मोठा प्राणी आहे.
विरल मृत्तिका गटातील एक धातुरूप मूलद्रव्य [ विरल मृत्तिका]. चिन्ह Yb. अणुक्रमांक (अणूकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ७०.
धातुरूप रासायनिक मूलद्रव्य. चिन्ह Y. आवर्त सारणीच्या (मूलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीच्या) तिसऱ्या गटातील धातुरूप संक्रमणी मूलद्रव्य.
ही हेक्झा-हायड्रॉक्सीसायक्लोहेक्झेने (सहा OH गट असलेली व वलयासारखी बंदिस्त संरचना असलेली कार्बनी संयुगे) होत.सूत्र C6H12O6.
अभियांत्रिकीच्या विविध शाखांत व उद्योगांत शैक्षणिक व मार्गदर्शक कार्य करणारी भारतीय संस्था.
घनरूप मूलद्रव्य. चिन्ह Ir. अणुभार १९३·१, अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ७७, आवर्त सारणी (मूलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील) गट ८.
अणू हा रासायनिक दृष्ट्या मूलद्रव्याचा लहानात लहान घटक आहे. पण विसाव्या शतकात या अणूचीही विभागणी त्याच्या घटक कणांत (मूलकणांत) करता येते.
प्रकाशाच्या विवर्तनाप्रमाणेच इलेक्ट्रॉनांचे विवर्तघडू शकते. या इलेक्ट्रॉन विवर्तनाचे दुहेरी महत्त्व आहे.
प्रभावी प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पदार्थाच्या रचनेची व इतरही माहिती प्रत्यक्ष मिळते.
सध्या सगळीकडे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे दिसतात. तागडीवाले, दोन पारड्याचे वजनकाटे क्वचितच आढळून येतात.
नळातील पाणी ज्याप्रमाणे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते त्याचप्रमाणे विद्युतप्रवाहही जास्त विद्युत दाबाकडून कमी विद्युतदाबाकडे किंवा जास्त व्होल्टेज पासून कमी व्होल्टेजच्या दिशेने वाहतो.
इलेक्ट्रॉन नलिका व अर्धसंवाहक [ज्यांची विद्युत् संवाहकता धातू आणि निरोधक यांच्या दरम्यान असते अशा पदार्थांपासून बनविलेल्या, अर्धसंवाहक] प्रयुक्ती यांना दिलेले गटनिदर्शक नाव.
विज्ञान व तंत्रविज्ञा यांच्या बहुतेक शाखांतील प्रयोग विभागातील कार्याचे इलेक्ट्रॉनीय उपकरण योजना हे एक महत्त्वाचे अंग झाले आहे
या कार्याकरिता लागणारी विद्युत् ऊर्जा, ही मंडले कार्यान्वित करण्याकरिता लावलेल्या एकदिश (एकाच दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् पुरवठ्यापासून मिळविली जाते.
विद्युत् प्रवाहाचा मार्ग हवा तेव्हा हवा त्या क्रमाने जोडणे अगर तोडणे ही कार्ये करणारी इलेक्ट्रॉनीय मंडले.