जळगाव शहर
जळगाव शहर : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १,०६,७११ (१९७१). मुंबईच्या ईशान्येस सु. ४१८ किमी. वर गिरणा–तापी दुआबात वसलेले, १८१८ मध्ये होळकरांकडून इंग्रजांच्या ताब्यात गेलेले व १८६२ पासूनचे भारतातील सर्वांत जुन्या लोहमार्गावरील स्थानक म्हणून गेल्या २०० वर्षांत विकास पावत असलेले प्रमुख व्यापारी, शैक्षणिक, औद्योगिक आणि वाहतुकीचे केंद्र आहे.